Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

नवी मुंबई प्रतिनिधी:- कासीम सय्यद

नवी मुंबई वाशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी 15 मार्च 2023 रोजी पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली. त्यानी प्रामाणिकपणे आपल्या पदाला आणि कामाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. दि.15 मार्च 2023 ते 30 एप्रिल 2023 च्या ह्या दीड महिन्याच्या त्यांच्या कालावधीत त्यांनी 8278 केसेस करून एकूण 67,17,750 रुपयांचा दंड कसुरदार वाहन चालकांना आकारला आहे. आशा प्रकारे दमदार कामगिरी करीत असतांना त्यांनी पहिल्यादाच 15,61,550 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सतीश कदम यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल बेलापूर न्यायालय येथे झालेल्या लोक न्यायालयास खूप चांगल्या प्रतिसाद मिळाला. पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील उत्तम प्रकारे सहयोग केला त्यामुळे एकट्या वाशी वाहतूक शाखेकडे 377 फोजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आले आहे. लोकन्यायालयामध्ये व.पो.नी. सतीश कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांच्या कामाची दखल घेवून त्यांना त्यांच्या कामाचे व कष्टाची भेट म्हणून कोर्टाकडून सतीश कदम यांना प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले आहे. व यापुढे देखील अशा प्रकारे सहयोग मिळणे अपेक्षित असल्याचे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related posts

*नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया’तर्फे रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचे आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे पोलिसांकडून घरफोडी व पाणी मीटर चोरणारे अटकेत

jantechasavdhanmaharashtra

*शरद पवार गटाची उमेदवारांची संभाव्य यादी*

Leave a Comment