Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया’तर्फे रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचे आयोजन*

 

नवी मुंबई :(प्रतिनिधी) ‘रस्ता सुरक्षा’बाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नवी मुंबई उप- प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ निमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने नवी मुंबई उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नेरुळ येथील वाहन तपासणी केंद्रामध्ये आणि वाशी येथील मैदानी चाचणी केंद्रात नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात वाहन तपासणी केंद्रावरील शेकडो वाहन चालक तसेच नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील ६० बस चालक तसेच १०० पेक्षा अधिक रिक्षा आणि अवजड वाहन चालक सहभागी झाल्याने या शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात नेत्र तपासणी दरम्यान दोष आढळणाऱ्या वाहन चालकांना आरटीओ कार्यालयामार्फत उप- प्रादेशिक परिवहन अधिकारी
दत्तात्रय सांगोलकर यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगोलकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रस्ता सुरक्षा सप्ताह रस्ता सुरक्षेबद्दल जागरुकता वाढवून भारतीय रस्त्यांवर सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्यास मदत करीत असल्याचे तसेच अपघात आणि मृत्युची संख्या कमी करण्यास मदत करीत असल्याचे यावेळी सांगितले. रस्ते अपघातांचा उत्पादन क्षमता आणि आर्थिक वाढीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह केवळ सामान्य लोकांच्या सुरक्षिततेसाठी नाही तर देशाच्या आर्थिक विकासासाठीही
महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ चे

वाहन चालक आणि नागरिकांची सुरक्षा असा मुख्य उद्देश असून उप-प्रादेशिक

परिवहन कार्यालय ‘रस्ता सुरक्षा’च्या दृष्टीकोनातून विविध उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील असल्याचेही सांगोलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी रस्ता सुरक्षा विषयावर उपस्थित असलेल्या सर्व वाहक, चालक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये श्री सत्य साई बुक्स अँड पब्लिकेशन्स ट्रस्ट आणि रामकृष्ण नेत्रालय अँड केअर यांनी मोफत वैद्यकीय तपासणी आणि चष्मा वाटपासाठी सहकार्य केले.

Related posts

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

*मुंबई हादरली! 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; दादर रेल्वे स्थानकात…*

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनची ठाण्यात मोठी कार्यवाही

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment