Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे ह्यांची अधिकारशाही

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे ह्यांची अधिकारशाही व बेशिस्त बाबी, काही अधिकारी आणि काही विभागाचे वरीष्ठ अधिकारी सुद्धा त्रस्त.

 

ठाणे प्रतिनिधी.(आनंद पार्टे)

ठाणे:- ठाणे महानगरपालिके मध्ये अनेक प्रकारचे कामे चालू असतात. काही काम आपत्कालीनची सुद्धा चालू असतात. अर्थात, रस्ते सफाई, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थापनची अशी महत्वाची कामे चालू असताना अनेक वेळा मिटिंग घ्यावी लागतात.

परंतु हेरवाडे हे महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहत असताना त्यांना भान असायला हवे की जेव्हा ते संबंधित अधिकारी यांच्याशी बोलतात तर ते त्यांची लायकी पासून ते सगळं काही त्यांच बोलण्यातून निघून जाते. समोरच्या व्यक्तीची माप काढतात. परंतु ते स्वतः जबाबदार अधिकारी आहेत आणि त्यांचे ते काम करत नाही. महापालिका आयुक्त यांनी खर तर या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे.

कोणते ही काम असेल किंवा स्वतःची जबाबदारी असेल त्यांनी किती चोखपणे केले पाहिजे ह्याचा त्यांना शुन्य अभ्यास दिसतोय, कारण एक सक्षम अधिकारी जर स्वतःला ते मानत असतील तर त्यांना कनिष्ठ अधिकारी यांना मान सन्मान देणे कळून आले असते.

सूत्रांनी अस सांगितले हेरवाडे यांच्या कोणत्याही मिटिंगला स्वतः एकदाही ते वेळेवर पोहचत नाहीत. म्हणजे हेरवाडे यांच्या पेक्षा मोठा शिपाई आहे निदान त्या शिपाईची श्रेणी जरी खालची असेल परंतु ते शिपाई वेळेवर पोहचतात आणि हेरवाडे सारखे वरिष्ठ अधिकारी वारंवार तास न तास मिटिंग ला उशिराने पोहचतात .

म्हणजे एक अतिरिक्त आयुक्त ह्या पदावर बसून हेरवाडे सारखे अधिकारी हुकूमशाही व अधिकार शाही जे गाजवतात ते काही लोकांचे स्पष्ट म्हणणं आहे.

महापालिका आयुक्त यांनी संपूर्ण विषयावर गांभीर्याने लक्ष टाकावे आणि अश्या बड्या अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी आणि त्यांना समज द्यावी. प्रशासनाचे सर्व अधिकारी यांचा मानसन्मान आणि महापालिका प्रशासनाचे कामकाज योग्य पध्दतीने पार पाडावे.

Related posts

अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांना मातृशोक*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment