
उपसंपादक :-कुंडलिक कानगुडे
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ्याच्या माध्यमातून राज्यातील अनेक भागातील पत्रकारांना येणाऱ्या अडचणींवर संघाने नेहमीच आवाज उठविला आहे मग ते ग्रामीण भागातील पत्रकार असो या शहरी भागातील सर्वांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने महत्वाचे पाऊल उचलले आहे कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्येही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने अतिशय महत्त्वाचा वाटा उचललेला आहे तो म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा पत्रकारांच्या असो वा जनतेच्या प्रत्येक वेळेला संघाने सामाजिक बांधिलकीतून राज्यामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटव सामाजिक कार्य केले आहे अशा या संघटनेच्या बांधणीसाठी सुरुवातीपासूनच सिंहाचा वाटा असणारे संघटनेचे प्रमुख संघटक संजयजी भोकरे हे नेहमीच पत्रकारांसाठी व त्यांच्यावर येणाऱ्या अडचणीसाठी अहो रात्र काम करत असतात अशा या अग्रगण्य पत्रकार संघटनेच्या प्रमुख संघट न पदी असणाऱ्या या महान व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरे करण्यात आले यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राज्य संघटनेचे अध्यक्ष वसंत मुंडे व राज्य सचिव विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक बांधिलकीतून वाढदिवस साजरा करण्यात आला याच अनुषंगाने नवी मुंबई महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संजयजी भोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत अण्णासाहेब पाटील माथाडी हॉस्पिटल चे प्रमुख डॉक्टर पाटील सर व डॉक्टर पाटील मॅडम यांच्या सहकार्यातून हॉस्पिटल येथे नवी मुंबई पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम या माध्यमातून हॉस्पिटल मधील रुग्णांना मिठाईवाटप करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती पत्रकार संघटनेचे कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके व संघटनेचे माजी अध्यक्ष व सल्लागार कुंडलिक कानगुडे तसेच खजिनदार राजू भाई मीर कोपरखैरणे संपर्कप्रमुख प्रमोद माने मुंबई तपाचे वरिष्ठ पत्रकार सुनील गायकवाड दैनिक अक्षराचे पत्रकार जेके पोळ पत्रकार सुरेंद्र सरोज पत्रकार अनंतराज गायकवाड पत्रकार विष्णुपुरे तसेच नवी मुंबईतील अनेक पत्रकार बंधू व कार्यकर्ते या सामाजिक उपक्रमात सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ व रुग्णांचे संस्थेचे सल्लागार कुंडलिक कानगुडे यांनी नवी मुंबई पत्रकार संघटनेच्या वाढीसाठी अनेक संघटनेतील माजी आजी पदाधिकारी व सदस्यांनी योगदान दिले अशा सर्व सदस्यांचे सल्लागार कुंडलिक कानगुडे यांनी आभार व्यक्त केले आभार व्यक्त करत असताना जुन्या सर्व सहकाऱ्यांचे आठवण काढत नवी मुंबईचे सुरुवातीचे संस्थापक माजी सचिव प्रवीण हांडे, नवी मुंबईचे दुसरे माजी सचिव अशोक लांडगे, व नवी मुंबईचे सध्याचे सचिव दिलीप म्हात्रे, त्याचबरोबर पत्रकार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष संजय नरवडे सध्याचे कार्याध्यक्ष अशोक काळे, माजी उपाध्यक्ष दिनकर, गायकर सध्याचे उपाध्यक्ष संजय वाघमारे व सदस्य सांगळे सर, विजय जुनगरे, संतोष म्हात्रे, माजी सल्लागार सुनील गुंजाळ ,सदस्य आरोटे ,अविनाश आरोटे, दीपक सोनवणे, मंगेश कदम, चव्हाण
या सर्व सहकार्याने नवी मुंबई संघटना वाढीसाठी सहकार्य केले त्यांचेही मनापासुन धन्यवाद मानले व कार्यक्रमाची सांगता झाली

