Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूज

काँग्रेस का मागे पडत चाललीय? का नाना पाटोळे नेतृत्व करू शकत नाही?

 

सहसंपादक अरुण बिराजदार

काँग्रेस का मागे पडत चाललीय? का नाना पाटोळे नेतृत्व करू शकत नाही?

देश भरात काँग्रेस सरकार एकेकाळी पूर्ण पसरली होती. पण २०१४ नंतर भाजप ने सरसकट काँग्रेस चा सुपडा साफ केला पण त्यानंतर महाराष्ट्र राज्यात काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात व नाना पटोले असे नेत्यांना नेतृत्व करण्यास पद देण्यात आले. जरी आपण काही मर्यादित वेळेस अपयशी झालो असेल तरी त्यावर कोणत्या प्रकारे काम करावे हे यांना योग्य रित्या जमलेले दिसून आले नाही.

कारण काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचे एकही आंदोलन असो, भाजपचे चुकीच्या कार्याला विरोध असो अशी कोणतीही भूमिका योग्यरीत्या घेतली नसून आज खरंतर काँग्रेस सारख्या पक्षाला महाराष्ट्र राज्यात काही विशेष प्रतिसाद नाही कारण त्यामुळे राज्यातले स्थानिक पक्ष जसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, मनसे, आणि इतर पक्षाच्या काही महत्त्वाच्या धोरण अथवा आंदोलन मुळे आज ते पक्ष काँग्रेस च्या पुढे गेलेले दिसून येत आहे.

वेळोवेळी शिवसेनेचे संजय राऊत सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे आवाज उठवून काही भूमिका स्पष्ट करत असताना दिसतात, तसेच शरद पवार असो राज ठाकरे असो हे सर्वे राजकिय नेते सरकार विरोधात पूर्ण पणे व्यक्त होत असताना दिसतात परंतु काँग्रेस चे बरेच नेते इतर पक्षातील नेत्यांचे भूमिके वर बोलत असताना दिसून येतात पण त्यात त्यांची स्वतःची काही भूमिका नसते.

आज महाराष्ट्र राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले जे काही काम करत आहेत ते लोकहित ची कामे नव्हे तर फक्त बघ्याची भूमिका घ्यायची जेणेकरून भाजप सारखे नेते ईडी, इन्कम टॅक्स , या सर्वं यंत्रणाचा वापर करून काँग्रेस सारखे पक्षाला पूर्ण पणे संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जर वेळीच काँग्रेसची मुख्य भूमिका या नेत्यांनी घेतली नाही तर महाराष्ट्र राज्यातून काँग्रेस हद्दपार होईल यात काही शंका नाही.

Related posts

वंडर्सपार्क त्वरीत सुरू करा.!!मा सभागृहनेते रविंद्र इथापे

jantechasavdhanmaharashtra

*स्व.ह.भप.बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! मुख्यमंत्री यांचे प्रशासनाला सूचना*

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईत चालत्या बसमध्ये अश्लील कृत्य करताना आढळले जोडपे; व्हिडीओ व्हायरल, कंडक्टरवर कारवाई

Leave a Comment