Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

रस्ता रुंदीकरणा मुळे वाहतूक कोंडीचे नियोजन योग्य रीतीने न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

प्रतिनिधी – आनंद पारठे

ठाणे: कल्याण महापा हा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उजव्या बाजूला ‘पूजा पंजाब’ हॉटेलच्या येथून जो कल्याण फाटा येथे मार्ग जातो. त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत रस्ता रुंदीकरण करण्याचं काम चालू असून त्या ठिकाणी योग्य ते नियोजन केले गेले नाहीये.

ज्या ठेकेदाराला ते काम करायला मिळाले आहे किंवा ज्या प्राधिकरणाकडून ते काम होत असेल त्या लोकांनी त्या संपूर्ण ठिकाणची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नसून त्यामुळे बऱ्याच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

त्यामूळे त्या ठिकाणी काही अपघात सुद्धा घडलेले आहेत, दुचाकीस्वार ह्यांचे अपघात होत असताना दिसून येतात, तरी रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कोणतेही पोलीस कर्मचारी असो, वार्डन असो किंवा सदर ठिकाणी ज्या प्राधिकरणाचे काम चालू आहे त्यापैकी कोणीच त्या ठिकाणी उपस्थित नसते तरी सदर वाहतूक विभागाने तातडीने त्यावर उपाययोजना करावी जेणेकरून रात्री-अपरात्री अपघात होणार नाहीत

आणि अपघात झालेल्या ठिकाणी जर वाहतूक कोंडी होत असेल तर तातडीने त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती राहिली पाहिजे जेणेकरून वाहतूक कोंडीला सुरळीत मार्ग भेटलं व नागरिकांना दिलासा भेटेल.

Related posts

राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पत्रकारांना टोलमाफी द्या; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मागणी*

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

jantechasavdhanmaharashtra

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

Leave a Comment