नवी मुंबई (प्रतिनिधी)
रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने नवी मुंबईमध्ये वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने व पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी वाहतुकीच्या नियमासंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे याचं धरतीवर रस्ता सुरक्षा सप्ताह 2024 अभियानांतर्गत नवी मुंबई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी रिलायन्स जिओ येथील कार्यालयातील कर्मचारी चालक व इतर कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा 2024 च्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम कसे पाळायचे यावर सविस्तरपणे प्रबोधन करण्यात आले यावेळी 300 ते 350 कर्मचारी हजर होते व

कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठ दिवसापासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनावर वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रामुख्याने बालाजी गार्डन फार्म सोसायटी कलश उद्यान रिलायन्स मार्ट व एपीएमसी कडे जाणाऱ्या मार्गावर 350 वाहनांवरती कारवाई करण्यात आली व वाहतुकीविषयी नागरिकांना प्रबोधन करण्यात आले

या अनुषंगाने पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक कोपरखैरणे वाहतूक शाखा विश्वास भिंगारदिवे यांनी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल येथील मुलांना वाहतुकीचे नियम कसे पाळावे व आपल्या पालकांना कसे समजावून सांगावे याबाबत प्रबोधन करण्यात आले यावेळी नवी मुंबईतील अनेक नागरिकांनी पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्यासह त्यांच्या अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले,

