Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

25 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्च्या APMC हद्दीत मुक्कामी असल्या मुळे वाहतुकीत बद्दल

APMC प्रतिनिधी :-जितू चव्हाण

सकल मराठा क्रांती मोर्चा दिंडीच्या अनुषंगाने लाखोंच्या संख्येने मराठी बांधव एपीएमसी येथे 25 /01/ 2024 रोजी मुक्कामी येणार असून या अनुषंगाने एपीएमसी वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या वतीने सर्व वाहतूकदारांना आवाहन करण्यात येत आहे की,
दिनांक २५/०१/२०२४ रोजी एपीएमसी वाहतुक शाखेच्या हद्दीत मनोज जरांगे पाटील हे त्यांचे ताफ्यासह मुक्कामास येणार आहेत. सदर वेळी वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन एपीएमसी वाहतुक शाखेच्या हद्दीतल खालील नमुद रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असुन ते दुस-या मार्गाने वळविण्यात येणार आहेत पुढील प्रमाणे

१. तुर्भे ते अरेंजा सर्कल मार्गे वाशी शिवाजी चौक जाणारे बसेस तसेच सर्व प्रकारची वाहणे यांना नमुद रोडवर दिनांक २५/०१/२०२४ रोजी दुपारी 2 वाजेपावसुन ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी 2 वाजे पर्यन्त प्रवेश बंदी करण्यात येणार आहेत. सदर वाहनांनी पनवेल सायन रोडने वाशी प्लाझा येथुन शिवाजी चौक मार्गे निश्चित स्थळी जातील.

२. महापे पावणे ब्रिज कोपरखैरणेकडून येणारी सर्व वहाने पामबीच रोडने अरेंजा सिंग्नल मार्गे निश्चत स्थळी जातील. मात्र अरेंजा सिग्नल येथील तुर्भेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात येणार आहे. तसेच पामबीच रोडवरील सीबीडी बेलापुर लेनवरील कोपरी ते अरेंजा सिग्नलचे दरम्यान गॅलेरिया मॉल, सत्रा प्लाझा, एमएसईबी स्टार येथुन डाव्या बाजुकडे एपीएमसी मार्केटकडे येणारे सर्व कडे येथुन आत वाहने आणन्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

३. अन्नपुर्णा सिंग्नल, माथाडी सिंग्नल कडुन पुनित कॉर्नर मार्ग डावीकडे वळून कोपरीकडे जाणारे तसेच सरळ बोनकडेकडे जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. पर्यायी रस्ता म्हणुन से. २६ मधील अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.

४. बोनकडे सिंग्नल कडुन पुनित कॉर्नर मार्ग माथाडी भवनाकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याकरिता पर्यायी मार्ग पुनीत कॉर्नर येथुन उजवीकडे ओळुन निश्चित स्थळी जातील.

५. एव्हलॉन स्कुल चौकातुन दक्षताकडे येणार व जाणारे दोनही मार्गावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

६. सानपाडा ब्रिज शिकार हॉटेल कडील बाजुस अन्नपुर्ण सिंग्नलकडे जाणारे व येणारे दोन मार्ग बंद करण्यात आले आहेत.

७. वारणा सर्कल येथे गोकुळ डेरीकडुन येणारे व जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

८). से. २० तुर्भे मार्गे माथाडी भावनाकडे येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

9). दक्षिण मुखी चौक येथे जनता मार्केटकडुन सर्विस रोडने येणारे जाणारे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सर्व एपीएमसी हद्दीतील वाहतूकदारांनी वरील दिलेल्या रोड संबंधित माहिती सर्व वाहनधारकांना कळवावी

Related posts

*अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा? संशय; रोहित पवारांचा खळबळजनक दावा*

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संपादक अरुण बिराजदार यांना वाढदिवसानिमित्त बोध चिन्हचे घड्याळ देऊन केला सन्मान

jantechasavdhanmaharashtra

*न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी चा SSC परीक्षेत सलग घवघवीत यश, १००% निकालाची परंपरा कायम*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment