अखेर म्हसवंडी बोर घाटाच्या रस्त्याला मंजुरी मिळाली

प्रतिनिधी:-साईनाथ शिंगोटे(अकोले,संगमनेर)
गेल्या अनेक वर्षांपासून मसवंडी बोर घाटाच्या रस्त्यासाठी मसवंडी व बदगी गावच्या नागरिकांनी प्रयत्न केले

, कित्येक वर्ष म्हसवंडीकरांनीही पत्रव्यवहार केले जिल्हास्तरावरती, मंत्रालय स्तरावरती, पण या गोष्टीला आश्वासनावर आश्वासना मिळत होती, अनेक समाजसेवकांनी प्रयत्न केले, आणि या प्रयत्नाला आता बऱ्याच वर्षापासून रखडलेले हे काम म्हसवंडी गावातील सरपंच उपसरपंच व नागरिक,एकता फाउंडेशन आणि बदगी गावातील समाजसेवकांनी या घाटासाठी सत्ता बदली झाल्यानंतर पुन्हा प्रयत्न चालू केले, आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या प्रयत्नाने जुन्नर तालुक्यातील आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत या कामाला अखेर मंजुरी मिळाली या मंजुरीनंतर आजूबाजूच्या सर्व गावातील ग्रामस्थांनी आमदार किरण लहामटे व आमदार अतुल बेनके यांचे मनापासून आभार व्यक्त केले या म्हसवंडी बोर घाटातील रस्त्याचा दळणवळणाचा फायदा अनेक आजूबाजूच्या पठार भागातील गावांना होणार आहे व या रस्त्यामुळे 2 जिल्ह्यांचा व 3 तालुक्यांचा दळणवळण मार्ग मोकळा होणार आहे, यामुळे शेतकरी व व्यवसायिकांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो,

व आमदार किरण लहामटे यांनी बदगी व म्हसवंडी या गावासाठी काही विकास कामांचे आश्वासन दिले होते तेही मंजूर करून त्या कामाचा उद्घाटन सोहळा काही दिवसापूर्वीच पार पडला त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या काम आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून झाल्यामुळे सर्वच स्थानिक नागरिकांचा उत्साह वाढत किरण लहामटे यांचे सर्व पठार भागातील नागरिकांनी कौतुक करत आनंद व्यक्त केला,
*रस्त्यांच्या कामासाठी ७ कोटी ३५ लाखांचा निधी ॥*
पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ मध्ये ५०-५४ अंतर्गत दळणवळणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील १५ रस्त्यांच्या कामांना ७ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. बेनके यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या कामांना मान्यता देण्यात आली होती. उपमुख्यमंत्री पवार हे जुन्नर तालुक्याला नेहमीच झुकते माप देत असतात, असेही त्यांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील रस्त्याचे नाव व कंसात मंजूर निधी : ओतूर शेटेवाडी रस्ता काँक्रिटीकरण (५० लाख रुपये), पिंपरी पेंढार ते म्हसवंडी रस्ता काँक्रिटीकरण (५० लाख), रा. मा. २२२ डिंगोरे-मराडवाडी-आळू- पुताचीवाडी ते प्रजिमा १५८ रस्ता (१९ लाख ३० हजार), प्रजिमा ४ पिंपळवंडी ते पिंपरी पेंढार (वेठेकरपट हद्द रस्ता) रामा २२२ म्हसवंडी जिल्हा हद्द रस्ता (५ लाख ३० हजार), येणेरे-काले- दातखिळेवाडी रस्ता सुधारणा इजिमा (१२ लाख ३० हजार), इजिमा ५ पिंपरी पेंढार रस्ता सुधारणा (४० लाख), डिंगोरे- मराडवाडी-आळू-पुताचीवाडी रस्ता सुधारणा इजिमा (१९ लाख ४० हजार), रामा २२२ अहिनवेवाडी- पाचघर-चिल्हेवाडी रस्ता सुधारणा इजिमा (४० लाख),
बेल्हे-कळस रस्ता सुधारणा इजिमा (७ लाख ४५ हजार), तळमाचीवाडी-कोकाटेवाडी-तळेरान-खुबी रस्ता सुधारणा इजिमा (९ लाख ७० हजार), भगतवाडी कुसूर ते प्रजिमा ५ धामणखेल ते खानापूर प्रजिमा १० ते ग्रामा १११ धालेवाडी रस्ता (धामणखेल हद्द ते लादी कारखाना) सुधारणा इजिमा (१६ लाख ६० हजार), इजिमा १६ बस्ती वडगाव सहानी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव आर्वी ते रामा १११ रस्ता सुधारणा इजिमा (१७ लाख ७० हजार), गोळेगाव-जुन्नर रस्ता सुधारणा इजिमा (४ लाख ६० हजार), इंगळूण ते भिवाडे खुर्द इजिमा क्र. २ रस्ता सुधारणा (६० लाख) आणि जुन्नर ते रामा १११ खोरेवस्ती धामणखेल निमदरी ते प्रजिमा १४ पर्यंत रस्ता इजिमा (१५ लाख ६० रुपये).

