Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या कामगिरी बद्दल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली सदिच्छा भेट व शुभेच्छा

कोपरखैरणे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भालचंद्र पाटील यांच्या कामगिरी बद्दल पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश निळकंठराव देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन दिल्या शुभेच्छा

कोपरखैरणे प्रतिनिधी :- दिनांक 05/03/2024 रोजी कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री.गणेश निळकंठराव देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली. सदरवेळी कोपरखैरणे पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर भालचंद्र पाटील यांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान आरोपीचा पाठलाग करून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला होता सदर वेळी आरोपीसोबत झटापट होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. औदुंबर पाटील हे जखमी झाले होते. त्यामुळे मा. आयुक्त श्री. देशमुख साहेब यांनी कोपरखैरणे पोलीस ठाणेस भेट देवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे वरिष्ठ निरीक्षक पदाचा पदभार स्विकारलेपासून श्री. औदुंबर पाटील यांनी पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नेमणुकीतील अधिकारी व अंमलदार यांचेसह विविध कारवाया करून पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणारे इसम, अनधिकृत व्यवसाय करणारे इसम यांचेवर कायदेशीर कारवाई करून पोलीस प्रशासनाचे नाव जनमानसांत उंचावले आहे. त्यांनी केलेल्या या चांगल्या कामगीरीचे कौतुक केले व

आयुक्त श्री. गणेश देशमुख  यांनी श्री.औदुंबर पाटील यांना व त्यांच्या सहका-यांना पुष्पगुच्छ देवून आरोग्यदायी व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related posts

कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने आर एफ नाईक कॉलेज,मध्ये .ट्राफिक रुल्स कसे पाळायचे मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईतून तडीपार असलेल्या गुन्हेगारानेच नवी मुंबईतून मोटरसायकल केल्या लंपास

jantechasavdhanmaharashtra

मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment