Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

साताऱ्याचा उमेदवार ठरला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी

*साताऱ्याचा उमेदवार ठरला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी*

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे.
आतापर्यंत शरद पवार गटाने 9 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला महाविकास आघाडीत एकूण 10 जागा मिळाल्या आहेत. अशात आता 9 जागांवरील उमेदवार जाहीर झाले असून एकाच जागेवरील उमेदवार जाहीर करणं बाकी आहे. आता फक्त माढाची जागा जाहीर करणं बाकी आहे. तिथंही धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार असण्याची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

तिसरी यादी

कोणाला किती आणि कोणत्या जागा?
शिवसेना (21) जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पूर्व(इशान्य)

राष्ट्रवादी (10) बारामती, शिरूर सातारा, भिवंडी दिंडोरी म्हाडा, रावेर, बीढ, वर्धा ,अहमदनगर दक्षिण

काँग्रेस (17) : नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई

शरद पवारांना मोठा धक्का
दरम्यान ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादीचे माजी शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत नंदकुमार मोगरे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर नंदकुमार मोगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Related posts

केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी

महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिका-यांना अग्निशमनशौर्यपदक जाहीर

jantechasavdhanmaharashtra

दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment