Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

चोरी व गहाळ झालेले 35 मोबाईल फोन कोपरखैरणे पोलिसांनी नागरिकांना परत मिळून दिले

चोरी व गहाळ झालेले 35 फोन कोपरखैरणे पोलिसांनी नागरिकांना परत मिळून दिले

नवी मुंबई (प्रतिनिधी)

कोपरखैरणे पोलीस स्टेशन चा चार्ज घेताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्हेगारांच्या मुसक्यावर आवळण्यात आल्या कोपर खैरना विभागामधील चोरी ड्रग्स घरफोडी अशा अनेक गुन्ह्यांवरती अंकुश ठेवून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि गहाळ व चोरी झालेले मोबाईल फोन अनेक वेळा औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोपरखैरणे पथकाने शोधून नागरिकांना परत केलेले आहे आणि आता पुन्हा
कोपर खैरणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करून अहोरात्र मेहनत घेऊन व पाठपुरावा करून पो. शि./12094 राहुल मोरे यांनी भारतातील विविध राज्यातून एकूण 35 मोबाईल फोन अंदाजे रू. 7,00,000/- किंमतीचे हस्तगत केलेले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये 1 आयफोनचा समावेश आहे. दि 28/08/2024 रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल फोन सन्मान पुर्वक औदुंबर पाटील यांच्या हस्ते व अधिकारी कर्मचाऱ्यां समवेत नागरिकांना परत करण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त करून पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले जनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचविल्या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांचे पोलीस ठाणे तील सर्व अधिकारी अंमलदार यांचे ही नागरिकानी विषेश उल्लेख करून आभार व्यक्त केला आहे

Related posts

*न्यू इंग्लिश स्कूल खामुंडी चा SSC परीक्षेत सलग घवघवीत यश, १००% निकालाची परंपरा कायम*

jantechasavdhanmaharashtra

दुरुस्ती कामामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावरून १ एप्रिलपासून वाहनांना बंदी; वाहतूक मार्गात बदल

jantechasavdhanmaharashtra

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

Leave a Comment