Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

अकरा मुक्या जनावरांना जीवदान. ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी.

अकरा मुक्या जनावरांना जीवदान.
ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी.

*कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या जनावरांची सुखरूप सुटका

आळेफाटा (प्रतिनिधी :- कैलास बोडके)-ओतूर (ता.जुन्नर) येथून एक ट्रक क्रमांक (एम. एच.१४ ए.एस.९३९७ ) ही गाडी कल्याण दिशेने पाळीव जनावरे कत्तली साठी घेऊन चालला असल्याची गोपिनीय खबर ओतूर पोलिसांना मिळाली असता ओतूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोनिका चौक या ठिकाणी नाकाबंदी करत असताना सदर ट्रकची तपासणी केली असता विना कागद पत्र बेकायदेशीर त्यात अकरा गायी,बैल निर्दयी पणे दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे कत्तली साठी घेऊन चालल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी पाळीव जनावरे ताब्यात घेऊन त्यांना पांजरपोळ गो शाळा मोशी (ता. हवेली )जिल्हा पुणे येथे सुरक्षित दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
महाराष्ट्र प्राणी संरक्षक व प्राण्यांचा छळ अधिनियम कायद्या नुसार मुजम्मील अब्दुल हमीद इनामदार वय ३६ वर्ष रा. जुन्नर,फैजान शेख, इशाद नावाचा इसम राहणार कल्याण ठाणे यांना ताब्यात घेतले असून ओतूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी संदीप भोते यांच्या सरकारी फिर्यादीवरून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, संदीप भोते, नामदेव बांबळे, आनंदा भवारी,शामसुंदर जायभाये, महेश पटारे, ज्योतीराम पवार, संतोष भोसले केली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दिनेश साबळे करीत आहेत.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत माथाडी भवन येथे कोरोना लसीकरण शिबिराचे उदघाटन केले

jantechasavdhanmaharashtra

आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून आणि गणेश नाईक चारिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

jantechasavdhanmaharashtra

लालबाग राजा’च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment