Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

*जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या*

संगमनेर (प्रतिनिधी)
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांच्यावब गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, त्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते, ते नर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.

नेमकं घडलं काय?

जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी 8 तास पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्याचा आरोप देखील केला जात होता.

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुखांवर गुन्हा दाखल

जयश्री थोरातांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच घटनेनंतर झालेल्या राड्याप्रकऱणी विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर वसंतराव देशमुखांचा शोध घेतला जात होता, मात्र ते फरार झाले होते, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.

Related posts

शिवछत्रपती को ऑप. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

jantechasavdhanmaharashtra

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी प्रवीण गाडे हे कायदा पायदळी तुडवतात का?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे 

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment