*नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या कचरावेचक भगिनींसोबत दशरथ भगत यांनी साजरा केला भाऊबीज व दिवाळी सण*
नवी मुंबई :- प्रतिनिधी
प्रतिवर्षीप्रमाणे नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने यंदादेखील वाशी येथील सेक्टर ३० परिसरात वास्तव्यास असलेल्या कचरावेचक भगिनींसोबत व त्यांच्या कुटुंबियांसोबत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ भगत यांनी संस्थेच्या सहकाऱ्यांसह भाऊबीज व दीपावली सण साजरा केला. उपस्थित सर्व भगिनींच्या परिवाराला दिवाळी निमित्त घरगुती फराळ भेट तसेच त्यांच्या सर्व लहान मुलांना प्रदूषण मुक्त फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी नवी मुंबईच्या स्वच्छतेत योगदान देणाऱ्या या भगिनींनी दशरथ भगत यांचे औक्षण केले व मिठाईचा गोड घास भरवून, आपल्या लाडक्या भावाला भरभरून आशीर्वाद दिले. यावेळी भगत यांनी सुद्धा या गोरगरीब भगिनींना नेहमीप्रमाणे तुमच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन देऊन, दररोज जमा कचऱ्यातुन रिसायकल पद्धतीचा अवलंब करून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती कडे वाटचाल कशी होईल याबाबतीत प्रकल्प राबविणणार असल्याचे विचार व्यक्त केले.
या उपक्रमात संस्थेचे मार्गदर्शक संदीप करसन भगत, शैलेश घाग, दिपक हन्नेहल्ली, सुजित खारकर व अन्य सदस्य सहभागी झाले होते.


