*रबाळे पोलिसांनी घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या ३ गुन्हेगारांना केले जेरबंद*
नवी मुंबई :- प्रतिनिधी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची रबाळे पोलीस ठाणे नवी मुंबई येथे नियुक्ती होताच अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचे माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी आपल्या टीमचे पथक नेमून रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चे ३ गुन्हे ऑटोरिक्षा चोरीचा १ गुन्हा व मोटरसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.
व तिन्ही आरोपीस रबाळे पोलिसांनी अटक केले
या गुन्ह्यातील अटक आरोपी नूर आलम जियाउल शेख उर्फ नूर आलम पंजाब शेख राहणार उत्तर प्रदेश. याच्या वरती भादवि कलम 354 380
आरोपी:- साई सुनील कांबळे वय 23 राहणार घनसोली नवी मुंबई याच्या वरती बी एन एस कलम 303 (2)
आरोपी सागर किरण पाटील वय 23 राहणार रबाळे नवी मुंबई याच्या वरतीबी एन एस कलम 303 (2)
या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी पथक म्हणून
सपोनी/दीपक खरात, पोहवा/ 102 भोसले, पोहवा/1761 कटके, पोहवा/2349 सोनवणे, पोहवा/1427 भरसट, पोना/3146 वीर,पोशी/12029 घुले व शासकीय अभियोक्ता श्री.रितेश सोनटक्के, बेलापूर कोर्ट,नवी मुंबई
सविनय सादर
ऐरोली रबाळे विभागातील नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत आभार व्यक्त केले
व सावंत यांनी नागरिकांना आव्हान केले की, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल संशय किंवा माहिती मिळाल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनशी संपर्क करावा व आपणही सुज्ञ नागरिक बनून आपल्या परिसरामधील गुन्हेगारी कमी करण्यास सहकार्य करायचं आहे व गुन्हेगारी पासून सावध राहायचे पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात

