Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*कोम्बिंग ऑपरेशन व विशेष मोहिम – वाशी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई*

**कोम्बिंग ऑपरेशन व विशेष मोहिम – वाशी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई**

वाशी –:

वाशी, ४ मे २०२५ – मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, श्री. पंकज डहाणे यांच्या आदेशानुसार व पोलीस उप-अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणे अंतर्गत ४ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन व विशेष मोहिम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.

या मोहिमेत विविध कायद्यांतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली:

* अवैध टपरी व ज्वालाग्रही पदार्थ प्रकरणी २ इसमांवर कारवाई
* बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर हत्यार कायद्यानुसार कारवाई
* अंमली पदार्थ सेवन प्रकरणी एकावर कारवाई
* मद्यप्राशनप्रकरणी ३ इसमांवर कारवाई
* विमल गुटखा जप्त – १,९८० रु. किंमतीचा माल जप्त
* कोटपा कायद्यानुसार १९ जणांवर कारवाई
* १ अजामीनपात्र वॉरंट, २ जामीनपात्र वॉरंट व ९ समन्स बजावले
* ३ हिस्ट्रीशीटर मिळून आले, १ तडीपार व ५ पाहिजे आरोपी मिळाले नाहीत
* २ नाकाबंदी ठिकाणी २०९ वाहनांची तपासणी, ७१ वाहनांवर कारवाई
* ११ हॉटेल, लॉज, बारची तपासणी – काहीही आक्षेपार्ह आढळले नाही
* विविध परिसरांत पायी गस्त व २२ संशयितांची चौकशी – परकीय नागरिक आढळले नाहीत

या मोहिमेत एकूण १०८ पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

अशीच मोहीम पुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.

*संजय धुमाळ*
*वरिष्ठ पोलीस निरीक्षक*
*वाशी पोलीस ठाणे**

Related posts

देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत माथाडी भवन येथे कोरोना लसीकरण शिबिराचे उदघाटन केले

jantechasavdhanmaharashtra

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या क्लिपवर स्पष्टीकरण देताना आमदार निलेश लंके

jantechasavdhanmaharashtra

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

Leave a Comment