Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*कोपरखैरणे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी – चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत करण्यात यश*

कोपरखैरणे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी – चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत

नवी मुंबई :-प्रतिनिधी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात नियुक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांनी गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवून नागरिकांमध्ये विश्वास आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. नागरिकांच्या मते, संपूर्ण नवी मुंबईत सर्वाधिक प्रमाणात चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत मिळवून देण्यात कोपरखैरणे पोलीस ठाण्याने आघाडी घेतली आहे.

अलीकडील तक्रारींनुसार, कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन *CEIR प्रणालीच्या* माध्यमातून शोधून काढण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गजानन टाकळे, सायबर पथकातील कर्मचारी राहुल मोरे आणि इतर सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन भारतातील विविध राज्यांतून हे मोबाईल हस्तगत केले.

दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात *एकूण 25 मोबाईल फोन, किंमत अंदाजे रु. 5,50,000/-* इतके, संबंधित नागरिकांना सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या प्रमुख उपस्थित सन्मानपूर्वक परत करण्यात आले.

चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून कोपरखैरणे पोलिसांच्या दक्षता, तत्परता व जनसेवेबद्दल मनःपूर्वक आभार मानले.

Related posts

अवजड वाहतूक उद्यापासून बंद?; ठाणे-नवी मुंबईतील निर्बंधांचा व्यवसायाला फटका

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्रातील 8 अग्निशमन अधिका-यांना अग्निशमनशौर्यपदक जाहीर

jantechasavdhanmaharashtra

*सायबर फसवणुकीवर नवी मुंबई पोलिसांचा प्रहार — १२ जणांच्या टोळीला अटक, देशभरातील ८८६ बँक खात्यांचा गैरवापर उघड*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment