Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*A.P.M.C. अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यावर परप्रांतीयांचा हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची मागणी*

*A.P.M.C. अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यावर परप्रांतीयांचा हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची मागणी*

नवी मुंबई, (जनतेचा सावधान महाराष्ट्र)

A.P.M.C. मार्केट परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या नियोजित कारवाईदरम्यान परप्रांतीय अतिक्रमणकर्त्यांकडून सुरक्षा रक्षक आणि पालिका अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना 13 नोव्हेंबर 2025 रोजी घडली. तुर्भे विभागांतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने A.P.M.C. मार्केटच्या भिंतीलगत चालू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई सुरू केली होती.

या कारवाईदरम्यान अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींनी सुरक्षा रक्षक सुनील रांजणे, निशांत बर्डे, लेबर कर्मचारी सुनील अमोल मन्या तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी भोईर यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण केली. कारवाई रोखण्यासाठी मुद्दाम गोंधळ घालण्यात आल्याचे समोर आले आहे.

हल्ल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला हा गंभीर गुन्हा असून, अशा घटनांमुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, A.P.M.C. परिसरातील अनाधिकृत व्यवसाय, अतिक्रमण व बेकायदेशीर धंद्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न वाढत असल्याने नागरिकांनी कायमस्वरूपी अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. अतिक्रमण कायमचे संपवण्यासाठी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईच आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

नगरविकास आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकरणात दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होऊन प्रशासनाला मुक्तपणे काम करण्यासाठी सुरक्षित वातावरण मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related posts

सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा

jantechasavdhanmaharashtra

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

25 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मोर्च्या APMC हद्दीत मुक्कामी असल्या मुळे वाहतुकीत बद्दल

Leave a Comment