Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा

*सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

सानपाडा(प्रतिनिधी)
सानपाडा पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व सानपाडा विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की सानपाडा विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात सानपाडा विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे सानपाडा विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा सानपाडा विभागात चालली आहे. पुढे बोलताना संजय नाळे यांनी सांगितले की अनेक तरुण-तरुणी व्यसनाधीन झालेले आहेत त्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता पालकांनी केलेले संस्कार जोपासणे ही त्यांची नैतिक पूर्व जबाबदारी आहे व पालकांचीही नैतिक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य वयात जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे त्यामुळे मुलं चुकीच्या मार्गाला जाण्यापासून थांबण्याचे सहकार्य होऊ शकते

Related posts

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

*सिडकोच्या कळंबोली नोडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी*

राष्ट्रवादीचे आमदार.निलेश लंके यांची कार्याध्यक्ष आकाश कोंढाळकर यांनी घेतली भेट*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment