Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सुरक्षा संदेश; सेवा सहयोगी ट्रस्टकडून ३०० हेल्मेटचे वाटप*

*विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सुरक्षा संदेश; सेवा सहयोगी ट्रस्टकडून ३०० हेल्मेटचे वाटप*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : रस्ते सुरक्षा आणि समाजहिताचा संदेश देणारा उल्लेखनीय उपक्रम म्हणून सेवा सहयोगी ट्रस्ट यांच्या वतीने तुर्भे येथील सामंत विद्यालय येथे विद्यार्थी व पालकांना ३०० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक नियमांचे पालन याविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका शुभांगी ताई पाटील, नगरसेविका कविताताई पाटील, एपीएमसी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे, शाळेचे संचालक सी. आर. पाटील, ट्रस्ट प्रतिनिधी रेश्मा पट्ट्म तसेच मुख्याध्यापक कोळी सर उपस्थित होते. यावेळी एपीएमसी वाहतूक शाखा चे कर्मचारी, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक घंटे यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हेल्मेटचा वापर केल्यास अपघातातील गंभीर दुखापती आणि मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते, त्यामुळे प्रत्येक पालकाने स्वतः सुरक्षितता पाळून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी सांगितले. नियम पाळणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून कुटुंबाच्या सुरक्षेशी निगडित सामाजिक कर्तव्य आहे, असा संदेशही त्यांनी दिला.


या उपक्रमामुळे पालकांमध्ये वाहतूक सुरक्षेबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले. समाजहित जपत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे ही कौतुकास्पद बाब असून सेवा सहयोगी ट्रस्ट, एपीएमसी वाहतूक शाखा आणि सामंत विद्यालय यांच्या संयुक्त सहकार्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Related posts

पत्रकारांचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव आपल्या सोबत – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे

jantechasavdhanmaharashtra

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसा निम्मित नवी मुंबई मधील भाजप कार्यकर्त्यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10 ट्रक अतिआवश्यक वस्तू कोकणा मध्ये रवाना

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment