Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

APMC पोलिसांकडून अपघात झाल्याचे भासवून लुटणाऱ्यांना बेड्या

 

APMC :- (प्रतिनिधी) गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगार पैसा उकळण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर केला जातो अशाच या गुन्हेगाराने एपीएमसी परिसरामध्ये पैसे कमावण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला तो म्हणजे गाडी ठोकल्याचा भासून पैसे उकळणे तुझ्या गाडीचा धक्का लागून माझा अपघात झाला आहे गाडी साईडला घे आणि मला माझ्या झालेल्या नुकसानीबाबत भरपाई दे असे सांगून वाहन चालकांना लुटणाऱ्या दोघा आरोपींना एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन गुन्ह्यांची उकल करून त्यांच्याजवळून एकूण ३८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील दोन्ही आरोपी नवी मुंबईतील असून अटक आरोपींपैकी एक आरोपीवर नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे.

नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत पाच मार्केट येतात यात धान्य बाजार, कांदा बटाटा बाजार, मसाला बाजार, भाजी तसेच फळ बाजारांचा समावेश आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या या बाजारपेठेमध्ये देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वाहने येत असतात. या वाहन चालकांना तुम्ही माझा अपघात केला आहे असे खोटे सांगून त्यांच्या जवळून नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम लुबाडणाऱ्या दोघांना
एपीएमसी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे व त्यांच्याजवळ ३८ हजार रुपयांची विविध प्रकारे मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. अटक करणाऱ्या आरोपींपैकी अमोल चतुर्भुज लांडगे, साहिल शाकीर शेख शिरवणे गाव यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तीन गुन्ह्यांची उकल करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले असून यातील आरोपी अमोल चतुर्भुज लांडगे यांच्यावरती नेरूळ पोलीस ठाण्यात याआधी जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. याबाबतचा अधिक तपास एपीएमसी पोलीस स्टेशनचे सीनियर PI अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निलेश कुमार महाडिक, पोलीस हवालदार /चंद्रकांत कदम दत्ता भगत, राजेंद्र बोराटे, पोलीस नाईक/ सोमनाथ काळे, पोलीस शिपाई/ आशिष पाटोळे, अमर भिलारे, संतोष वाटकर, एपीएमसी पोलीस करीत आहे.

Related posts

जुन्नर तालुक्यातील साहित्यिक”पहिले सीए.डॉ.एन.बी.चव्हाण यांची जीवन कथा

jantechasavdhanmaharashtra

तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती*

jantechasavdhanmaharashtra

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची तातडीने दखल घ्यावी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रयांकडे केली मागणी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment