Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घारगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ भारतीय डाक ऑफिस फोडत तिजोरी लंपास नांदुर खंदरमाळ परिसरात पाच घरे फोडली.

                  प्रतिनिधि सतीश फापाळे संगमनेर

संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव परिसरात बुधवार दि.१२ जानेवारी रोजी पहाटे घारगाव येथील भारतीय डाक विभागाचे पोस्ट ऑफिस फोडून पोस्ट मधील तिजोरिसह मुद्देमाल घेऊन चोर पसार झाले तर नांदुरमध्ये चार घरे तर खंदरमाळवाडीतील एक घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.


पठार भागातील चोरीचे सत्र काही थांबताना दिसत नाही.यातच घारगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी पहाटे भारतीय डाक विभागाचे पोस्ट ऑफिस फोडून तिजोरीसह अडोतिस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.तर दुसरीकडे खंदरमाळ वाडीतील शिवाजी मनाजी फणसे यांचे घर तसेच नांदुर गावातील सगाजी अण्णा सुपेकर,सत्यवान बबन सूपेकर. रेवजी खंडू सुपेकर,शैलाबाई रामदास सुपेकर हे चार घरे फोडत लाखो रूपयांचा मुद्देमाल घेऊन चोर पसार झाले आहे.
या घटनेची घारगाव पोलीसांना माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक राजेंद्र लांघे यांचेसह पोलिस पथकाने घटना स्थळी भेट देत ठसे तज्ञ,श्वान पथकास पाचारण करत पुढील तपास चालू केला आहे.

Related posts

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

jantechasavdhanmaharashtra

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

Leave a Comment