Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*चैतन्यपूर येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व १९ वा वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरवात*

*चैतन्यपूर येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह व १९ वा वर्धापन दिन सोहळ्याला मोठ्या उत्साहात सुरवात*

प्रतिनिधी:(कानिफनाथ गवांदे)

सालाबाद प्रमाणे याही वर्षी चैतन्यपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी झाली आणि सांगता दिनांक 27 फेब्रुवारी रोजी होणार असून यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाला ५० वर्षे होत असून सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या सप्ताहासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे व १९ वा वर्धापन दिन सोळा ही मोठ्या उत्साहात पार पडत आहे या सप्ताह निमित्ताने दैनंदिन कार्यक्रम सकाळी ४ ते ५ काकडा, ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ व रात्री ७:३० ते ९:३० प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन व व रात्री 10 नंतर जागर भजनाचा कार्यक्रम
सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने प्रसिद्ध कीर्तनकार दिनांक

१९/०२/२०२५ रोजी ह.भ.प. विक्रांत महाराज शिंदे (ठाणे)

२०/०२/२०२५ रोजी ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेर)

२१/०२/२०२५ रोजी ह.भ.प. भरत (बाळासाहेब) महाराज शिंदे (बारामती)

२२/०२/२०२५ रोजी ह.भ.प. आक्रूर महाराज साखरे (गेवराई बीड)

२३/०२/२०२५ रोजी ह.भ.प. रोहिणीताई महाराज परांजपे (पुणे)

२४/०२/२०२५ रोजी ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे

२५/०२/२०२५ रोजी रूपालीताई महाराज सवणे (परतूरकर)

२६/०२/२०२५ रोजी ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत (डोंबिवली)

२७/०२/२०२५ रोजी ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत (डोंबिवली) काल्याचे कीर्तन (सकाळी–९:३० ते ११:३०)

शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन झाल्यानंतर संपूर्ण सोहळ्याची सांगता होते व संपूर्ण सप्ताह हा एक गावकऱ्यांसाठी आनंदाचा दिवसच असतो गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये वार्ड असतात त्या प्रत्येक वाढला प्रत्येक दिवसाची जबाबदारी दिलेली असते आणि ती प्रत्येक जण आनंदाने पार पाडत असतात व संपूर्ण सप्ता चालू आहे तोपर्यंत सर्वच गावकरी एकत्र भोजन करत असतात व संपूर्ण गावामध्ये आनंदाचे वातावरण या निमित्ताने प्रत्येक वर्षी असते यावर्षी सप्ताह ५० वर्ष होत असल्यामुळे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून या सप्ताहाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन साजरा करत असतात मग ते लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत व महिलाही या कार्यक्रमाच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात ५० वर्ष ही परंपरा जपत आलेले ग्रामस्थ आता नवीन पिढीलाही तीच परंपरा जपण्याचा मार्गदर्शन करतात व तरुणही या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात ग्रामीण भागात दिवस-रात्र राबणारा शेतकरी वर्ग हा या सप्ताह निमित्ताने आपली परंपरा व परमार्थ जपत या सोहळ्याचा आनंद घेत असतो या गावातील मुंबई पुणे नाशिक कामानिमित्ताने गेलेले गावकरी तरुण वर्ग सुद्धा या सोहळ्यानिमित्त गावाकडे येत असतात व या सोहळ्यात सहभागी होऊन आपली परंपरा जपत असतात

Related posts

*पोटच्या लेकीचा खून; १२ तासांत निर्दयी बाप गजाआड, आळेफाटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई*

मुख्यमंत्री महोदय यांनी ठाणेकरांसाठी नवीन वर्षी जीव गमवण्यासाठी दिले गिफ्ट “डायघर डम्पिंग प्रकल्प” .

jantechasavdhanmaharashtra

*शाळेतील स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना – निकृष्ट कामाचा पर्दाफाश, जबाबदारांवर कारवाईची मागणी*

Leave a Comment