Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपची तातडीने दखल घ्यावी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रयांकडे केली मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
‘ज्योती देवरे यांनी 11 मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींवर आणि वरिष्ठ अधिकार्‍यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्‍यांना पोलीस अधिकार्‍यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे, महिला कर्मचार्‍यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण नेल्यानंतर देवरे यांच्याच बदनामीचा प्रयत्न करणे, वरिष्ठ अधिकार्‍यांकडूनही त्यांना धमक्या प्राप्त झाल्या आहे, कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यातही अडचणी उत्पन्न करणे आणि मग थेट मंत्र्यांकडे त्यांच्या बदलीची शिफारस करणे, यातून महिला अधिकार्‍यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार घडला आहे, असं फडणवीस पत्रात म्हणाले आहे.
तसंच, दीपाली चव्हाण प्रकरणाचा उल्लेख करून मी सुद्धा तुझ्याकडे येतेय, हा त्यांचा ऑडिओमधील आवाज अंगावर शहारे आणणारा आहे. एक स्त्री अधिकारी आपले कर्तव्य पार पाडत असताना संपूर्ण यंत्रणाच तिचे मानसिक खच्चीकरण करीत असेल आणि परिणामी त्या महिला अधिकार्‍याला आत्महत्येचा इशारा द्यावा लागत असेल तर ही बाब अतिशय गंभीर आणि मनाला वेदना देणारी आहे’ असंही फडणवीस म्हणाले.

Related posts

नवी मुंबईतील विविध गुन्ह्या संदर्भात पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची पत्रकार परिषद

jantechasavdhanmaharashtra

वाॅर्ड क्र. १०० मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटने संप्पन्न.

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment