Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीय

भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची, हाच देशातील जनतेचा निर्धार ! भास्कर जाधव

*भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची, हाच देशातील जनतेचा निर्धार*

*शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा भाजप मुद्द्यांवर जोरदार प्रहार*

नवी मुंबई प्रतिनिधी – नरेंद्र मोदी यांच्या यांच्या वागण्यात बोलण्यासाठी भाषणात पूर्वीसारखा जोश राहिलेला नाही. माहिती आपण आता बुडणार आहे. बुडत्याला खाडीचा आधार म्हणून त्यांनी हिंदू मुस्लिम हा मुद्दा पुन्हा वर काढला आहे. मात्र त्याचा कोणताच उपयोग होणार नाही. भाजपला बुडवायचे आणि लोकशाही वाचवायची असा निर्धार देशातील जनतेने केला आहे. त्यामुळे कितीही नौटंकी केली तरी मोदी सरकार वाचणार नाही, असा घाणघात शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आज नवी मुंबई मध्ये केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी वाशी येथील मासाहेब मीनाताई ठाकरे मैदानात सायंकाळी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये भास्कर जाधव यांनी भाजप आणि मिधे गटाचे अक्षरशा धुलाई केली. गद्दार जेव्हा शिवसेना सोडून गेली तेव्हा राजन विचारे भक्कमपणे मातोश्री च्या पाठीशी खंबीर उभे राहिले. त्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेवर पाठवा असे आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित त्यांना केले.

याप्रसंगी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे नेते भाई जगताप, अभिनेते किरण माने, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशीक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, आधी उपस्थित होते

Related posts

सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा

jantechasavdhanmaharashtra

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेविदारांचा अंत पाहू नये!  ————  15 ऑगस्टपूर्वीच बँक अवसायानात काढावीः कांतीलाल कडू

jantechasavdhanmaharashtra

तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment