Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*रेझिंग डे व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सामंत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वाहतूक प्रबोधन*

*रेझिंग डे व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त सामंत विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वाहतूक प्रबोधन*


प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

पोलीस उप आयुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई तिरूपती काकडे यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेझिंग डे व रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अनुषंगाने वाशी वाहतूक शाखेच्या APMC वाहतूक उपशाखेच्या वतीने तुर्भे येथील सामंत विद्यालयात विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात रस्ता वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालना, पादचाऱ्यांचे हक्क, सिग्नलचे महत्त्व, हेल्मेट व सीटबेल्ट वापर, मोबाईल फोनचा वापर टाळणे तसेच अल्पवयीनांनी वाहन चालवू नये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केले.

या प्रबोधन कार्यक्रमास सामंत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीचे सुमारे १२० ते १५० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक शिस्त आणि रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे नियम समजावून सांगण्यात आले तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

APMC वाहतूक उपशाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत शाळा, महाविद्यालये, रिक्षा-टॅक्सी संघटना, ट्रक-टेम्पो संघटना तसेच रहिवासी सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे प्रबोधन कार्यक्रम सातत्याने राबविले जात असून, माहिती पत्रके, स्टिकर्स व जनजागृती साहित्याचेही वाटप करण्यात येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्हिडीओ व फोटोद्वारे जनजागृती केली जात आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व अधोरेखित होत असून, भविष्यात सुरक्षित व जबाबदार नागरिक घडविण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी व विशेषतः पालकांनीही मुलांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related posts

*राजेंद्र बोडके यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नवी मुंबई अध्यक्ष पदी निवड*

लालबाग राजा’च्या दरबारात पोलिसांची मुजोरी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की

jantechasavdhanmaharashtra

केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणाऱ्यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रुपये सूट द्यावी

Leave a Comment