Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा*

*सिडको घरांच्या किमतीत १० टक्के कपात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत मोठी घोषणा*

 

नागपूर, दि. १३ : नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत जाहीर केला आहे. सिडकोकडून विविध प्रवर्गातील घरांसाठी निश्चित करण्यात आलेल्या दरांमध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येणार असून, त्यामुळे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न अधिक सुलभ होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, सिडकोने नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७ हजार घरे उभारली आहेत. या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार असून, त्यापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इडब्ल्यूएस आणि एलआयजी प्रवर्गातील घरांच्या किमतींमध्ये १० टक्के कपात करण्यात येणार असल्याने मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे अधिकृत आणि दर्जेदार घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी राज्य सरकार आणि सिडकोमार्फत हे पाऊल उचलण्यात आले असून, नवी मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्राला यामुळे सकारात्मक चालना मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

Related posts

समाजसेवक निलेश कचरे यांच्या पाठपुराव्याला यश; सानपाड्यात पोलीस चौकी पुन्हा सुरू,

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

हजार, लाख की कोटी… तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता?

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment