Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट पर्यंत आरोग्य शिबीर

रायगड प्रतिनिधी:-

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, (DY RTO) पेण- रायगड यांच्यामार्फत व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय रायगड व आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या मदतीने दिनांक *23 ऑगस्ट ते 28ऑगस्ट 2023 मुंबई गोवा हायवेवरून (स्थळ: खारपाडा टोल नाका)* प्रवास करणाऱ्या प्रवासी बसेस चालक यांच्या नेत्र व आरोग्य तपासणीसाठीच्या शिबिराची सुरुवात केली आहे.
यामध्ये 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट 2023 सकाळी 10:00 ते सायं 5:00 पर्यंत हा उपक्रम पार पडला.
मुख्यतः *रात्री उशिरा चालणाऱ्या प्रवासी वाहन चालकांसाठी पुढील 26 ते 28 ऑगस्ट, सायं 6:00 ते रात्री 12:00 वाजेपर्यंत* तपासणीचे आयोजन केलेले आहे.
यामध्ये ज्या चालकांचे डोळ्यांना चष्मा असणे गरजेचे आहे अशा चालकांना मोफत चष्मा दिला जाणार आहे.
*वरील उपक्रमाचा लाभ मुंबई गोवा महामार्गावर चालणाऱ्या सर्व प्रवासी बस चालकापर्यंत पोहोचवून आपण कृपया या उपक्रमास प्रसिद्धी द्यावी हि विनंती*

*दिनांक 23 ते 25 ऑगस्ट तीन दिवसांचा अहवाल*

*एकूण तपासणी केलेले प्रवासी चालक 584
*सुस्थितीत आढळलेले चालक 269
*मोफत चष्म्याचे वाटप : 195
*पुढील सखोल तपासणीचा सल्ला दिलेले चालक :114
(यामध्ये रेटीना:07, कॉर्निया:15, मोतीबिंदू:37, कलर व्हिजन:11, कंजेक्टिव्हिटीज : 02 यांचा समावेश आहे)

– उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण-रायगड
(संपर्क: मोवानि: शशिकांत तिरसे: 9975049900)

Related posts

माजी आ.वैभवराव पिचड कोरोना पॅाझिटीव्ह !! उपचारासाठी मुंबई कडे रवाना..

jantechasavdhanmaharashtra

म्हसवंडी, आंबीखालसा, कुरकुंडी भोजदरी, गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर.

दिल्ली उच्च न्यायालयात बलात्कारामुळे उद्भवलेल्या गर्भधारणा समाप्तीच्या प्रकरणांमध्ये याचिका दाखल

Leave a Comment