Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*एपीएमसी वाहतूक पोलिसांची प्रसंगावधानता; रक्ताच्या उलट्या करणाऱ्या एसटी वाहकाला वेळेत रुग्णालयात दाखल करून वाचवले प्राण*

*एपीएमसी वाहतूक पोलिसांची प्रसंगावधानता; रक्ताच्या उलट्या करणाऱ्या एसटी वाहकाला वेळेत रुग्णालयात दाखल करून वाचवले प्राण*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : कर्तव्य बजावत असतानाच मानवतेचे दर्शन घडवत एपीएमसी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) एका वाहकाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळून त्याची प्रकृती स्थिर झाली. या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीमुळे संबंधित वाहतूक पोलिसांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आज बोनकोडे सिग्नल येथे एपीएमसी वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल दिलीप गढरी (HC/4182), पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र केकाणे (PC/4075) आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मिना कासराळे (WPC/3425) हे वाहतूक नियमनाची जबाबदारी पार पाडत होते. त्यावेळी ठाणे-मुखेड मार्गावरील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एमएच 14 एलएक्स 3623 क्रमांकाची बस तेथे आली.

बस चालकाने तातडीने पोलिसांना माहिती दिली की, बसमधील वाहकाला अचानक फिट आली असून त्याला रक्ताच्या उलट्या होत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाहतूक पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता बोनकोडे ते कोपरी सिग्नलदरम्यान वाहतूक सुरळीत करत बसला प्राधान्याने मार्ग उपलब्ध करून दिला. तसेच कोपरी सिग्नल परिसरातील वाहतूक नियंत्रणात ठेवून बसला कोणताही अडथळा न येऊ देता पाम बीच रुग्णालयात सुरक्षितपणे पोहोचविण्यास मदत केली.

रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी वाहकावर तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की, संबंधित रुग्णाला वेळेत रुग्णालयात आणण्यात आल्यामुळे त्याची प्रकृती सध्या स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत.

याबाबत एपीएमसी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले की, “मुंबई पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी हा केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरता मर्यादित नसून जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध आहे. कर्तव्य बजावत असताना एखाद्या नागरिकाचा जीव वाचविण्याची संधी मिळाली, तर ती आमची नैतिक आणि मानवी जबाबदारीच असते. आमच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतेची भावना ही संपूर्ण पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे. अशा प्रकारच्या सेवाभावी कार्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.”

वाहतूक पोलिसांच्या या तात्काळ आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संबंधित एसटी वाहकाला वेळेत उपचार मिळाले आणि संभाव्य अनर्थ टळला. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच संकटाच्या क्षणी नागरिकांच्या मदतीला धावून जाणे हेच पोलीस दलाचे खरे कर्तव्य असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. एपीएमसी वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल दिलीप गढरी, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र केकाणे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मिना कासराळे यांच्या या मानवतावादी व कौतुकास्पद कार्याचे नागरिक, एसटी कर्मचारी तसेच विविध स्तरांतून मनापासून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.

Related posts

पोलिस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान व्हायला पाहिजे- विवेक पानसरे ( नवी मुंबई पोलिस उपायुक्त परिमंडळ1)

jantechasavdhanmaharashtra

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

रस्ता रुंदीकरणा मुळे वाहतूक कोंडीचे नियोजन योग्य रीतीने न केल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment