Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*ओतूरमध्ये हरवलेला साडेतीन वर्षांचा मुलगा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सापडला*

*ओतूरमध्ये हरवलेला साडेतीन वर्षांचा मुलगा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सापडला*

आळेफाटा (कैलास बोडके )ओतूर बाजारपेठेतून सकाळपासून बेपत्ता झालेला साडेतीन वर्षांचा चिमुकला ओतूर पोलिसांच्या तत्पर शोधमोहिमेमुळे अवघ्या काही तासांत सुखरूप सापडला. आकाश प्रकाश केदार असे या मुलाचे नाव आहे.

वाघदरा, ता. जुन्नर येथील शेतमजूर प्रकाश किसन केदार वय २५ यांनी आज सकाळी ओतूर पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यांचा मुलगा आकाश याला बाजारपेठेतून एका महिलेने नेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

तक्रार मिळताच पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने हालचाल केली. बाजारपेठ, बस स्थानक , के.टी. बंधारा परिसर व मार्केट यार्ड येथे तपास पथके रवाना करण्यात आली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आकाश त्याच्या आजीसोबत जात असल्याचे दिसून आले.

आजीजवळ मोबाईल नसल्याने संपर्क होत नव्हता. पोलिसांनी आजीचा शोध घेऊन आकाशला ताब्यात घेतले व त्याच्या वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून केदार कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या शोधमोहिमेत ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवलदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, देविदास खेडकर, मयुरी खोसे,विशाल गोडसे, योगेश उर्किडे, जोतिराम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओतूर पोलिसांच्या या जलद कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

Related posts

एनएमएमटी बसला पुन्हा आग चालकाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना; 

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी – चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत करण्यात यश*

jantechasavdhanmaharashtra

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

Leave a Comment