Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संपादक अरुण बिराजदार यांना वाढदिवसानिमित्त बोध चिन्हचे घड्याळ देऊन केला सन्मान

नवी मुंबई (प्रतिनिधी)
नवी मुंबई मध्ये व्यावसायिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपत, समाज हितासाठी काहीतरी करावे या हेतूने गेल्या अनेक वर्षापासून, अरुण बिराजदार यांनी पत्रकार क्षेत्रात पदार्पण केले .व अनेक गरीब व गरजू लोकांसाठी पत्रकारते मधून न्याय मिळवून देण्याचे काम अरुण बिराजदार यांनी नवी मुंबई या ठिकाणी केले. पत्रकारिता करत असताना शासकीय, प्रशासकीय, राजकीय सर्व क्षेत्रातील व्यक्तींवर चांगल्या प्रकारची पकड त्यांनी पत्रकारते मधून केली. व याच अनुषंगाने द टाइम्स ऑफ लिजेंड या वृत्तपत्राचे मुख्य संपादक यांनी त्यांच्यावर संपादकीय जबाबदारी टाकली व येत्या काही दिवसा मध्ये जनतेचा सावधान महाराष्ट्र या वृत्तपत्राची संपादकीय धुरा सुद्धा त्यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक पत्रकार घडविण्याचे काम त्यानी केले आहे ,अशा या समाज उपयोगी व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्ताने, त्यांच्या नवी मुंबई येथील घनसोली या कार्यालयामध्ये नवि मुंबई  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, व संघटनेचे बोध चिन्ह असलेले घड्याळ त्यांना भेट देऊन, त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, नवी मुंबई सल्लागार कुंडलिक कानगुडे, नवी मुंबई खजिनदार राजू मीर, आमची मुंबई वृत्तपत्राचे पत्रकार सुनील गायकवाड, व पत्रकार राकेश वाघ, आनंद पार्टे आदी. मान्यवर व पत्रकारांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला

Related posts

मनसे कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कोपरखैरणे सेक्टर एक व दोन विभागातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याला सुरुवा

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीत देशभक्तीचा जल्लोष*

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यविधी*

Leave a Comment