Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*म्हसवंडी गावातील दोन सुपुत्रांचा विशेष सन्मान ! – नवी मुंबई मा सभागृह नेते, रवींद्र इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत*

*म्हसवंडी गावातील दोन सुपुत्रांचा सन्मान ! – नवी मुंबई मा सभागृह नेते, रवींद्र इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत*

 

म्हसवंडी (ता.संगमनेर) येथील मळादेवी यात्रेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात गावातील दोन सुपुत्रांचा गौरव करण्यात आला. नवी मुंबईचे सभागृह नेते मा. रवींद्र इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात *‘यशोमंदिर पतसंस्थे’* चे नवनिर्वाचित संचालक *अंकुश बोडके* व गेली १३-१४ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणारे *राजेंद्र बोडके* यांचा सन्मान करण्यात आला.

अंकुश बोडके हे यशोमंदिर पतसंस्थेवर दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आले असून, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. अनेक ग्रामस्थांनी त्यांना भावी अध्यक्ष म्हणून शुभेच्छा दिल्या. यावेळी नवी मुंबई महापालिका माजी नगरसेविका सुरेखा इथापे यशोमंदिर पतसंस्थेचे इतर संचालक बी जी गायकर अशोक वाळुंज अमोल उगले दिनेश फापाळे मंगेश हांडे उपस्थित होते त्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व गावांमधील ग्रामस्थांपैकी सरपंच सुरेखा इथापे उपसरपंच मंगेश बोडके नवी मुंबई भाजप युवा कार्यकर्ता राहुल इथापे मीरा-भाईंदरचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव इथापे यशोमंदिर पतसंस्थेचे माजी संचालक शरद बोडके पांडुरंग बोडके बाबुराव इथापे सुभाष बोडके नवी मुंबई मंडळाचे सचिव सुदाम बोडके खजिनदार रमेश बोडके सामाजिक कार्यकर्ते किरण शिवाजीराव बोडके अमोल बोडके नवी मुंबई सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक जालिंदर शेळके संभाजी बोडके दत्तात्रय बोडके हरीश बोडके गणेश सातकर व गावातील सर्व ग्रामस्थ सर्व मंडळे या सर्वांनी शुभेच्छा दिल्या

 

या कार्यक्रमात राजेंद्र बोडके यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी बोलताना सांगितले, “राजेंद्र बोडके हे आमच्या गावाचे भूषण आहेत. त्यांनी गेल्या १३-१४ वर्षांपासून नवी मुंबईत कार्यरत राहून ‘*जनतेचा सावधान महाराष्ट्र*’ हे वृत्तपत्र सुरू केले आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य सातत्याने केले आहे.”

तसेच, *‘सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज’* या वाहिनीचे ते मुख्य संपादक असून, या माध्यमातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निर्भीड व निष्पक्ष पत्रकारितेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शासन आणि प्रशासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करत असताना, त्यांनी सामान्य जनतेच्या अडचणी प्रभावीपणे पुढे मांडण्याचे कार्य केले आहे.

रवींद्र इथापे पुढे म्हणाले,की “नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदाच्या काळात जनहिताच्या अनेक उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात राजेंद्र बोडके यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे अनेक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.”

या सर्व कार्याची दखल घेत त्यांची नुकतीच *महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नवी मुंबई अध्यक्षपदी* निवड करण्यात आली. ही बाब संपूर्ण म्हसवंडी गावासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्यावर ग्रामस्थांनी व पत्रकारितेतील सहकाऱ्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

नवीन पदभाराच्या निमित्ताने सभागृह नेते रवींद्र इथापे, म्हसवंडी ग्रामस्थ, व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने राजेंद्र बोडके यांना पुढील वाटचालीसाठी  दिल्या शुभेच्छा

Related posts

आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश,आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी:-..देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

*रबाळे पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद; अमली पदार्थविरोधी कारवाईसह सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर*

एक हात मदतीचा* *अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकामधी बेलापूर गावचे युवक आणि या कोरोना काळातील कोविड योद्धे श्री किसन पंढरीनाथ भोईटे,यांना कोरोना पॉझिटिव्ह मुळे प्राव्हेट हॉस्पिटल मध्ये एडमीट केले आहे त्यांची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे आपली एक मदत त्यांचे कुटुंब सावरू शकते*

Leave a Comment