Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

रबाळे पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी – चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड; २.४० लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

 

रबाळे पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी – चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड; २.४० लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

नवी मुंबई (रबाळे) – रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यांचा पर्दाफाश करून पोलिसांनी एकूण २.४० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणात एक संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

📌 घटना तपशील
११ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे २.१० वाजता सेक्टर-९, घरोदा घनसोली येथील खाडी ब्रिजवर फिर्यादी सौ. श्यामलता रामकृष्ण सिंग (वय ३८ वर्षे, रा. रबाळे) पायी जात असताना आरोपीने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन खेचून पळ काढला. या घटनेवरून रबाळे पोलीस ठाण्यात गु.रजि. क्र. ६०४/२५, कलम ३०९(४) भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

📌 तपास आणि अटक
गुन्हा घडल्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी रवाना झाले. सीसीटीव्ही फुटेज तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा कोपरखैरणे परिसरात शोध घेऊन रोहित शिवाजी गायकवाड (वय २४ वर्षे, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई, मूळ रा. बीड) यास शिताफीने अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली असून, तपासात तो दहा महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर २०२४) रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गु.रजि.क्र. ५५०/२४ मधील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सामील असल्याचे उघड झाले. आरोपीकडून दोन्ही गुन्ह्यांतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

📌 हस्तगत मालमत्ता
१) ७०,००० रुपये किमतीची ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन
२) १,७०,००० रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र
➡ एकूण: २,४०,००० रुपये किमतीचे दागिने

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील

📌 तपास पथक

  • सपोनि अविनाश पाळदे (तपास अधिकारी)
  • पो.हवा. प्रसाद वायंगणकर
  • पो.ना. विजय करंकाळ, प्रल्हाद जाधव
  • पो.शि. राहुल साळुंके, राजेश तडवी, भोपी, अभिजित राळे

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Related posts

तुर्भे पोलिसांकडून सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला

म्हसवंडी गावात पडला दरोडा!! एकाच वेळी फोडली 7 घरे…*

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment