Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार…

 

मुंबई (प्रतिनिधी)- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील.

Related posts

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

17 प्लाझा च्या बाजूला एपीएमसी विभागामध्ये हॉटेल कुबेर च्या बाजूला ट्रिपल पार्किंगमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या

म.रा.मराठी पत्रकार संघ सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना दिल्ली येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी बहाल

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment