Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*रबाळे पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन*

*रबाळे पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन*

ऐरोली (प्रतिनिधी)

पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या आदेशानुसार रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यापक नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या विशेष मोहिमेंतर्गत गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवर कारवाई व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक तपासणी सुरू आहे.

घनसोली येथील टेम्पटेशन हॉटेल चौक, ऐरोली चेक पोस्ट या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. हद्दीतील लॉजेस व हॉटेल्सचीही कसून तपासणी सुरू असून, ऐरोली नोसील नाका, घनसोली, तळवली, रबाळे व हळदी परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे.

दारू दुकान व बिअर शॉप समोर उघडपणे दारू पिणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. तसेच प्रलंबित गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेणे, गुन्हेगार व हिस्ट्रीशीटर यांची तपासणी या मोहिमेचा भाग आहे.

या मोहिमेत परिमंडल एक अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याचे एक अधिकारी आणि १० अंमलदार सहभागी असून, पोलीस उपायुक्त (परिमंडल एक) यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. परिमंडल एकचे स्ट्रायकिंग फोर्स तसेच एसीपी वाशी यांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग आहे.

या संपूर्ण ऑपरेशनवर एसीपी आदिनाथ बुधवंत हे मार्गदर्शन करत आहेत. या कारवाईत एकूण २ पोलीस निरीक्षक, १७ अधिकारी आणि ७५ अंमलदार सहभागी झाले आहेत.

**- बाळकृष्ण सावंत,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रबाळे पोलीस ठाणे*

Related posts

आयुष्याचे गणित* (भाग – १)  *Mathematics of Life* !!..प्रशांत नेहरकर

17 प्लाझा च्या बाजूला एपीएमसी विभागामध्ये हॉटेल कुबेर च्या बाजूला ट्रिपल पार्किंगमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

Leave a Comment