Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वाशी वाहतूक विभागाचे टॅक्सी व रिक्षा चालकांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन

*वाशी वाहतूक विभागाचे टॅक्सी व रिक्षा चालकांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन*

नवी मुंबई/ प्रतिनिधी: वाहतूक व्यवस्थेबरोबरच वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमांचे पालन करून अपघात टाळता येऊ शकतात . शहरात वाहतूक व्यवस्था अत्यंत प्रभावीपणे राबविली आणि वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमच पाळले नाही तर अपघातांचे प्रमाण वाढू शकते, असे मत नवी मुंबई वाशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम
यांनी व्यक्त केले.

यावेळी वाहतूक नियमांची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी बोलताना सांगितले की, टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मोटार वाहतुक अधिनियमांची माहिती देण्यात आली. त्यात त्यांना वाहतुकीचे नियम पाळायचे व नियम मोडल्यावर किती रुपयांचा दंड तसेच कोणती शिक्षा होते याची देखील यावेळी माहिती दिली.

दरम्यान २८ नोव्हेंबर २०२३ रोजी वाशी मधील सेक्टर १७, वाशी प्लाझा येथे रिक्षा व टॅक्सी चालकांची मिटींग घेवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी त्यांना गणवेश परीधान करून वाहन चालविणे, प्रवाशी ओव्हरसीट भरून वाहन चालवू नये, कोणत्याही प्रवाशाला भाडे नाकारु नये, सर्व प्रवाशांसोबत सौजन्य पूर्वक वागणूक ठेवून वाहतुकीचे नियम पाळावेत. तसेच रिक्शा बेशिस्तपणे कोठेही पार्क न करणे याबाबत सुचना देवून योग्य ते मार्गदर्शन केले.व यानंतर कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
सर्व रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांचे मार्गदर्शन केल्या बद्दल आभार व्यक्त केले.

Related posts

जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा!

jantechasavdhanmaharashtra

रिझर्व्ह बँकेने कर्नाळा ठेविदारांचा अंत पाहू नये!  ————  15 ऑगस्टपूर्वीच बँक अवसायानात काढावीः कांतीलाल कडू

jantechasavdhanmaharashtra

अष्टविनायक मित्रमंडळ कोपरखैरणे यांनी गणरायांची जयमल्हार ची प्रतिमा स्थापन केली

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment