Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूज

*वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची कठोर मोहिम — नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव!*

*वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची कठोर मोहिम — नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव!*

नवी मुंबई (जनतेचा सावधान महाराष्ट्र)

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागात वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीची कोंडी ही गंभीर समस्या बनली होती. या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे वाहतूक विभागाने नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देत वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम हाती घेतली.

दि. २७ ऑक्टोबर २०२५ ते दि. १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान,कोपरखैरणे डी मार्ट चौक ते कोपरखैरणे रेल्वे स्टेशनदरम्यानच्या रस्त्यावर    वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे ९२५ वाहनावर कारवाई करून ९७५५००/ रुपये दंड ठोठावण्यात आला.  

या कारवाईमुळे परिसरातील वाहतुकीचा वेग आणि शिस्त सुधारली असून नागरिकांकडून वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल अत्यंत प्रभावी ठरले आहे.

कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि अशोक वाघ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहन चालकांनी वाहने नेमून दिलेल्या ठिकाणीच पार्क करावीत, वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि वाहतूक विभागास सहकार्य करावे.

नवी मुंबई वाहतूक विभागाचे हे तत्पर, जबाबदार आणि जनहिताचे कार्य शिस्तबद्ध नागरी जीवनासाठी एक आदर्श ठरले आहे.
**वाहतुकीत शिस्त — सुरक्षिततेत प्रगती!**

Related posts

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

jantechasavdhanmaharashtra

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

*आनंदाची बातमी: सिडकोकडून २२ हजार घरांची नवी लॉटरी – सर्वसामान्यांच्या घराच्या स्वप्नांना नवी दिशा*

Leave a Comment