Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि.चे 25 वी वार्षिक सर्वसाधर सभा सम्पन्न

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि.चे 25 वी वार्षिक सर्वसाधर सभा व सभासद प्रशिक्षण कार्यक्रम सम्पन्न

*पारिजात को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड नवीमुंबई संस्थेची २५ वी वार्षिक सभा*
पारिजात को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड नवीमुंबई संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी
शिव विष्णु मंदिर हाॅल ,प्लाॅट नं. ८/९ ,सेक्टर ९ ऐ, वाशी बस डेपो जवळ नवीमुंबई येथे संस्थेचे अध्यक्ष श्री.कृष्णा धुमाळसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली. विषय पत्रिकेतील १४ विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. प्रथम गणेश पुजन करण्यात येऊन महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व ठाणे जिल्हा बोर्ड यांचे संयुक्त विद्यमाने उपस्थित सभासदांना ठाणे जिल्हा बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तानाजी पानसकरसाहेब यांनी


सभासदांचा संस्थेच्या व्यवसायातील सहभाग व सभासद हक्क व जबाबदारी या विषयावर प्रशिक्षण दिले.
३१ मार्च २०२२ अखेर संस्थेच्या ठेवी ₹ १४४ कोटी व कर्ज वाटप ₹ ११० कोटीच्या पुढे आहे.संस्थेने ₹ ४५ कोटीपेक्षा जास्त रककमेची स्वतंत्र गुंतवणूक केली आहे.संस्थेचा स्विनधी ₹ १३.४५ कोटी आहे. संस्थेचा समिश्र व्यवसाय ₹ २५४ कोटींहून अधिक आहे. सन २०२१-२२ करीता ऑडीट वर्ग “अ ” मिळाला आहे. अहवाल सालात मृत पावलेल्या दिवंगत मान्यवर सभासद, ठेवीदार , हितचिंतक यांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेत झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील बालकलाकार परी उफ॔ मायरा हिला विशेष पुरस्कार सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले ,

संस्थेचे दैनंदिन ठेव प्रतिनिधि व उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वोत्तम शाखा पुरस्कार प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री.कृष्णा धुमाळ साहेब यांनी संस्थेच्या कार्य अहवाल व कामकाजाबद्दल माहीती उपस्थित सभासदांना दिली. सभेस संस्थेचे उपाध्यक्ष श्री.कैलास खोपडे साहेब संचालक मंडळ सदस्य श्री.श्रीपती गरुड , श्री.दिपक टेळे, श्री. अमृत पाटील, श्री.आनंदा आंबवले, श्री. राजेंद्र कोंडे , श्री.कमलाकर कदम, श्री.शिवाजी महाडिक , श्री. अनंत प्रभाळे, सौ.मंगल खोपडे , कु.रसिकां धुमाळ , श्री.शिवाजी सुळ, तज्ञ संचालक श्री विजय मोरेसाहेब , सी. ए. किरण भोसलेसाहेब उपस्थित होते. सभेचे सुत्र संचालन संस्थेचे महाव्यवस्थापक श्री. तानाजी शिंदे यानी केले.

 

Related posts

*पुणे ग्रामीणमधील अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार, १५-२०% अपघात कमी करण्याचे लक्ष्य*

jantechasavdhanmaharashtra

शिवछत्रपती को ऑप. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

jantechasavdhanmaharashtra

अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स

Leave a Comment