Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा

*मोदींकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळणार ; केंद्रात तीन मंत्रीपदे, ‘या’ नावाची चर्चा..*

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
शिंदे गटातील काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळाची ऑफर मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

मोदी सरकारने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय मंत्रिमंडळाळचा विस्तार करत असल्याचं बोललं जात आहे. तर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार असल्याचे समजते.

शिंदे गटाला शिवसेना नावासह आता धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने आता मुंबई महापालिका निवडणुकीकडे शिंदेंचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी, यासाठी मोदी सरकारकडून शिंदेंना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील कुठल्या नेत्याला संधी मिळते याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

Uddhav Thackeray : काय सांगता : धनु्ष्यबाणानंतर ठाकरेंच्या हातातून आता ‘मशाल’ही जाणार ?
केंद्रात शिंदे गटाला दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना संधी मिळू शकते असं बोललं जातं. यात राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे गटाची भाजपला मदत व्हावी या हेतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहुल शेवाळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. श्रीरंग बारणे यांना मंत्रिपद देत पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यात विदर्भात प्रतापराव जाधव यांनाही मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

महाष्ट्रात सत्तातर झाल्यानंतर अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार यावर चर्चा सुरु आहेत, अशात राज्याआधीच आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे. उद्या (रविवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महाराष्ट्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत बैठक होणार असल्याचे समजते.

Related posts

*नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी हरवलेले २५ लाख रुपये किंमतीचे १२२ मोबाईल फोन नागरिकांना परत*

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईतून तडीपार असलेल्या गुन्हेगारानेच नवी मुंबईतून मोटरसायकल केल्या लंपास

jantechasavdhanmaharashtra

नवीमुंबई पालिका आधिकारी कोपरखैरणे विभागात जाणून बुजून पाणी कमी सोडतात-!! शंकर मोरे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment