Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या नूतनीकरण कार्यालयाचे उदघाटन

संपादक:- राजेंद्र बोडके 

दिनांक 23/02/2023 रोजी कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या सुंदर आणि सुसज्ज आशा नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उदघाटन होत असताना नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कोपरखैरणे वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उदघाटन पार पडले. या वेळी कर्मचाऱ्यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करणे आणि तेही महिलांना प्राधान्य दिले हा एक मोठा पोलिस डिपार्टमेंटचा आदर्श आहे आणि आयुक्तांचे मोठेपण आहे अशी चर्चा नागरिकांन मध्ये होत आहे ,आयुक्त मिलींद भारंबे यांची नवी मुंबई मध्ये नियुक्ती होताच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मोठा धसका घेतला ,


चार्ज घेताच त्यांनी नवी मुंबई मधील अनाधिकृत व्यवसाय बंद केले पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धतीवर विशेष लक्ष केंद्रित केले आणि नविमुंबई करांची त्यांच्या बद्दलची कुतूहलता वाढली आणि संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांनी त्यांचे कौतूक केले, त्यांची काम करण्याची शैली आणि नागरिकां बद्दलची पोलिसां विषयीची भावना ही आपुलकी मध्ये निर्माण केली, नवी मुंबई तील आयुक हे नागरिकांन मधील रिअल सिंघम आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे,त्यांचा पोलिस कर्मचाऱ्यांन बद्दलचा विचार आज आपल्याला त्यांच्या कामा मधून कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या उदघाटन प्रसंगी पाहायला मिळाला मानसन्माना पेक्षा कामाला महत्व देणारे आयुक्त नवी मुंबईला मिळाले याचा अभिमान नवी मुंबई कराना या दृष्टीकोनतुन पाहायला मिळाला


या वेळी उपस्थित सह पोलिस आयुक्त संजय मोहिते , व पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे वाहतूक विभाग नवी मुंबई यांची ही काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई वाहतूक विभागाची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याचे प्रयन्त केले सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकां मध्ये वाहतुकी विषयी जनजागृती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या मर्गदर्शना खाली करण्यात आली .व कोपरखैरणे विभागातील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांच्या नियुक्ती नंतर कोपरखैरणे विभागातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने अतिशय चांगला प्रयन्त केला व वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली व कोपरखैरणे वाहतूक शाखेचे कार्यालय अतिशय दुरावस्थेत असल्यामुळे तिथे बसने ही अवघड होते पण भिंगारदिवे यांच्या नियुक्ती नंतर त्यांनी ते सुंदर आणि सुसज्ज करून घेतले ,व या उदघाटना प्रसंगी पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे व सहाय्यक निरीक्षक विश्वास
भिंगारदिवे यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे व सह आयुक्त संजय मोहिते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आयुक्त व सह आयुक्तांचे स्वागत केले

Related posts

मालमत्ताकर माफीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करा!!. लोकनेते आमदार गणेश नाईक यांची राज्य शासनाकडे मागणी

jantechasavdhanmaharashtra

आशाताई बुचके यांचा भाजप प्रवेश,आघाडीमुळे तिन्ही पक्षांचा श्वास कोंडला, भाजपाला विस्ताराची संधी:-..देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे

Leave a Comment