Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजराजकीयसंपादकिय

अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स

*अजित चव्हाण ठरू शकतात ‘डार्क हॉर्स’*

 

नाशिक प्रतिनिधी

नाशिकची जागा लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाला सोडावी यासाठी नाशिकच्या सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. भाजपला नाशिकची जागा सोडावी, असा टाहो सर्वांनी नेतृत्वाकडे फोडला.

नाशिकची जागा भाजपला सुटली तर भारतीय जनता पक्षाचे सह मुख्य प्रवक्ते, भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस, श्रीकांत भारतीय यांच्या खास गोटातील व निकटवर्तीय अजित चव्हाण हेदेखील यात बाजी मारून ‘डार्क हॉर्स’ ठरू शकतात ? भाजपच्या मिशन-२०२४ निवडणूक समन्वय समितीच्या राज्य सहसमन्वयक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी चव्हाण यांच्याकडे आहे.

गुजरातमधून केंद्रीय नेतृत्वाच्या निकटवर्तीयांनी त्यांच्यासाठी प्रयत्न चालविल्याची सूत्रांकडून माहिती आहे. त्याचबरोबर नाशिक येथून
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही वरिष्ठांनीदेखील भाजप नेतृत्वाकडे अजित चव्हाण यांचे नाव लावून धरल्याची माहिती आहे. घराघरांत ओळखीचा चेहरा, उत्कृष्ट वक्ता, अजातशत्रू प्रतिमा, भाजपमध्ये अल्पावधीत राज्य व स्थानिक पातळीवर सर्वांशीच असलेले मधुर संबंध व उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन या वरिष्ठ नेतृत्वाशी असलेली जवळीक त्यामुळे चव्हाण यांना अल्पावधीत पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. गेले दोन दिवस ते दिल्ली, गुजरात या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाच्या जवळच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन रात्री उशिरा नागपूर येथे रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. सोलापूर येथे राम सातपुते यांच्याप्रमाणेच पक्ष नेतृत्वाचे उमेदवार देण्याचे धक्कातंत्रही असू शकते. लोकसभेच्या उमेदवारीसाठी अजित चव्हाण योग्य असल्याने नाशिकची जागा भाजपला सुटली तर चव्हाण या शर्यतीत ‘डार्क हॉर्स’ ठरू

शकतात, असे बोलले जाते.

Related posts

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा*

jantechasavdhanmaharashtra

बंदुकीचा धाक दाखवून बिल्डिंग कंट्रक्शन साइटवर फायरिंग करणाऱ्या दोन आरोपींना रबाले पोलिसांनी केले गजाड !

jantechasavdhanmaharashtra

*अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था व अपंग संजीवनी सोशल वेलफेयर फाउंडेशनचा वर्धापन दिनानिमित्त स्वरनाद कराओके गीत गायन स्पर्धा 2026 उत्साहात संपन्न*

Leave a Comment