Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी श्रमिक सेनेची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा*

*नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी श्रमिक सेनेची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिका श्रमिक सेना पदाधिकाऱ्यांनी आज सन्मा. वनमंत्री गणेश नाईक साहेब यांची भेट घेऊन महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. कामगारांच्या हितासाठी व त्यांच्या भवितव्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

या प्रसंगी श्रमिक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. संजिवजी नाईक, सरचिटणीस श्री. चरण जाधव, नवी मुंबई महानगरपालिकेचे श्रमिक सेना अध्यक्ष श्री. राजुसिंग भा. चव्हाण, उपाध्यक्ष श्री. सुनिल गावित, सरचिटणीस श्री. रामकृष्ण चव्हाण, सचिव श्री. अभिजित वसावे, उपाध्यक्ष श्री. उमा आदरवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्रमिक सेनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० वर्षे करावे, तसेच करार व ठोकमाधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता.

कामगारांच्या या न्याय्य मागण्यांबाबत सन्मा. वनमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत महापालिका सभागृहाचे गटनेते मा. सागरजी नाईक यांना येणाऱ्या प्रथम स्थायी समिती व महासभेत या विषयांचा विचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, श्रमिक सेनेच्या प्रयत्नांमुळे कामगारांच्या हक्कांसाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related posts

*पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठाप्रथम प्राधान्य देण्यात यावे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक*

मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित रबाळे येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्यांचे वाटप

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई मध्येआईनेच केला10 दिवसांच्या मुलीचा सौदा, विक्री करताना आईसह, चाैघांना अटक

Leave a Comment