Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

होमिओपॅथिक डॅाक्टरांचे सर्व प्रश्न लवकरच सोडवू,!!.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे

*होमिओपॅथिक डॅाक्टरांचे सर्व प्रश्न लवकरच सोडवू,मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांचे ‘हिम्पाम’संघटनेला आश्वासन-डॅा.प्रतिक तांबे,सहसचिव,हिम्पाम,महाराष्ट्र.*

अशोक काळे(नवीमुंबई प्रतिनिधी) मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची हिम्पाम,महाराष्ट्र च्या पदाधीकार्यांनी नुकतीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली व त्यांना होमिओपॅथिक डॅाक्टरांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत माहीती दिली.होमिओपॅथिक डॅाक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले व त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.याबाबत त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले कि ते स्वतः व सर्व संबंधीत मंत्री महोदय,मा.सचिव,शासकीय अधीकारी,हिम्पाम संघटनांचे प्रतिनिधी यांची शासन स्थरावर लवकरच एका मिटींगचे आयोजन करून होमिओपॅथीक डॅाक्टरांचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन हिम्पाम शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक व हिम्पाम,महाराष्ट्र चे अध्यक्ष डॅा.एस.टी.गोसावी यांच्या नेतृत्वाखाली व नवी मुंबई हिम्पाम चे उपाध्यक्ष डॅा.राम सांगळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या भेटीदरम्यान हिम्पाम महाराष्ट्र चे सहसचिव डॅा.प्रतिक प्र.तांबे,सहखजिनदार डॅा.एम.आर.काटकर,हे उपस्थित होते.

Related posts

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी

jantechasavdhanmaharashtra

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

चालू ट्रेन मधून मोबाईल चोरून पसार होणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी केली अटक

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment