Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूज

मुख्य रस्त्याच्या मधून रस्ते काढण्यात आले जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करताना.

 

प्रतिनिधी – संतोष ज्ञानेश्वर वेणूपुरे

मुख्य रस्त्याच्या मधून रस्ते काढण्यात आले जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करताना.

महापे: कोपरखैरणे कडून महापेकडे ब्रिज वरून जाणाऱ्या टेकनॉसिटीच्या रस्त्याच्या इथे हे डिव्हायडर नागरिकांनी काढलेले आहे. कारण त्यांना यू-टन्‌ घेण्यासाठी पुढच्या ब्रिज पासून यावे लागते. परंतु हा डिव्हायडर नागरिकांनी काढल्यामुळे त्यांना हे सोप्पे झाले आहे.

त्यात त्यांचे पेट्रोल आणि वेळ हे दोन्हीही बचत होते. पण या गोष्टींमुळे नागरिक हि गोष्ट विसरतात कि ते स्वतःच्या जीवाशी खेळत आहेत. तसेच या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. वरील दिलेल्या फोटोप्रमाणे दुचाकी वाहने या गोष्टींचा खूप प्रमाणात वापर करताना आढळत आहेत.

त्यामुळे अपघाताचा धोका उद्भवू शकतो. या जागेवर किमान महिन्यातून छोटे-मोठे दोन तीन अपघात होतात. त्यामुळे चारचाकी व अवजड वाहनचालक त्रस्त होतात. तसेच यावर तोडगा म्हणून नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी लोखंडाचे पर्मनंट डिव्हायडर लावायला हवेत. जर हे पर्मनंट डिव्हायडर नवी मुंबई महापालिकेने लावले तर इथे कुठलाही अपघात होणार नाही, त्यामुळे कुठलीही जिवीत हानी होणार नाही व चारचाकी व अवजड वाहनचालक त्रस्त होणार नाहीत.

तसेच तिथेच रस्त्यावरती दोन-तीन खड्डे पण आहेत. तर त्यांचंही काम नवी मुंबई महापालिकेच्या संबंधित बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी यांच्या लक्ष्यात आणून दिले असून त्यांनी यावर लवकरच काही काम केले पाहिजे जेणेकरून नागरिक सुखरूप राहतील.

Related posts

*१५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना दीड तासात कोपरखैरणे पोलीसांनी केली अटक; पीडित मुलाची सुखरूप सुटका*

jantechasavdhanmaharashtra

*जुन्नरच्या कायदा-सुव्यवस्थेला सक्षम नेतृत्व; उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचा जनतेचा सावधान महाराष्ट्रतर्फे गौरव*

यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?

Leave a Comment