Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आंबीदुमाला येथे भव्य आयोजन*

*महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आंबीदुमाला येथे भव्य आयोजन*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथे सिद्धार्थ तरुण मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे उत्साहपूर्ण व भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १० मे २०२६ रोजी आयोजित या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक ऐक्य, बंधुता आणि विचारप्रबोधनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरणार आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत विविध महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक, बुद्धपूजन, ध्वजारोहण, जाहीर सभा तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता बुद्धपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर ध्वजारोहण पार पडणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता महामानवांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी ७.३० वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ८.३० वाजता स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या महोत्सवासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. राष्ट्रपती पुरस्कार विजेते मा. श्री. खंडू रघुनाथ माळवे , लोककलावंत सांस्कृतिक विचारमंच मा. श्री. गवनेरजी सरोदे, साहित्यिक श्री. राजेश साबळे, सामाजिक कार्यकर्ते आदर्श शिक्षक मा. श्री. विजय साळवे, मुख्य संपादक जनतेचा सावधान महाराष्ट्र (वृत्तपत्र) श्री. राजेंद्र बोडके, मराठी युवा उद्योजक मा. श्री. पंढरीनाथ विश्वनाथ कौटकर, युवा उद्योजक पुणे मा. श्री. हिरामण नरवडे, युवा उद्योजक पुणे मा. श्री. बबन गागरे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गायकवाड, नवी मुंबई स्कूल बस ड्रायव्हर सौ अनिता माघाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत, सामाजिक सलोखा व बंधुभाव वृद्धिंगत व्हावा आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सिद्धार्थ तरुण मित्रमंडळ, आंबीदुमाला यांच्या वतीने रावसाहेब सरोदे यांनी दिली .

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य

श्री रोकडेश्वर देवस्थान ट्रस्ट आंबी दुमाला, श्री रोकडेश्वर महिला लेझीम पथक आंबी दुमाला श्री रोकडेश्वर पतसंस्था मर्या आंबी दुमाला श्री रोकडेश्वर धर्मादाय फंड मंडळ गणेश मित्र नवतरुण मित्र मंडळ आंबी दुमाला जय मल्हार मित्र मंडळ व टाळ पथक आंबी दुमाला सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन अध्यक्ष सचिव सदस्य व कर्मचारी वृंद आंबी दुमाला

 

Related posts

नवी मुंबई पोलिसांनी करोडोचा गुटखा सप्लाय करणाऱ्या आरोपींना केले जेर बंद!

jantechasavdhanmaharashtra

*विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीचे संस्कार; वाशी वाहतूक पोलिसांचा आदर्श उपक्रम*

दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा… नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – खासदार राजन विचारे*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment