Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नवी मुंबई पोलिसांनी करोडोचा गुटखा सप्लाय करणाऱ्या आरोपींना केले जेर बंद!

महाराष्ट्र राज्यात गुटखा पान मसाला सप्लाय करणाऱ्या गुन्हेगारांना ९९,७८, २६४ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह नवी मुंबई पोलीसांकडुन अटक

कुंडलिक कानगुडे

नवी मुंबई पोलिसांची एक मागोन एक अशी गुटखा वरील कारवाई होत आहे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली व झोन 1 चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्हे उघडकीस येत आहे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चांगली मोहीम राबवत आहे यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्तीचे या कारवायांमुळे धाबे दणाणले आहे , विवेक पानसरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या पुढेही अशी कडक कारवाई चालू राहील , तुर्भे पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक . रविंद्र दौंडकर  यांच्या टीमने  अतिशय मेहनत घेऊन चांगली कामगिरी करून गुटखा सप्लाय करणाऱ्यां गाड्या ताब्यात घेऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात असणाऱ्या विषारी गुटख्याचे आरोपी जेर बंद करून  नागरिकांचे आरोग्यची हानी होण्या पासून वाचविण्याचा प्रयन्त केला त्याबद्दल नवी मुंबईतील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

यापूर्वी दिनांक १९/०२/२०२३ रोजी महापे चेक पोस्ट येथे सकाळी ०७:३० वा. सुमारास तुर्भे पोलीसांना नाकाबंदी दरम्यान चेकिंग करीत असताना एका टेम्पोमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला मिळुन आला होता. सदरवेळी ११,९६,८००/-रूपये किंमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला गुटख्याच्या ३० मोठया गोण्या व ६,०००००/- रूपये किंमतीचा टेम्पो क्रमांक एम. एच. ४६ बी. एम. / ९४६२ असा एकूण १७,९६,८०० /- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून तुर्भे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नंबर ८९/२०२३ भादंविसं, कलम ३२८, २७२, २७३, १८८, सह अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम २६ (२) (॥), २६ (२) (IV), २७ (२) (E), सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य अधिसुचना क्रमांक असुमाअ / अधिसुचना ५२४ /७, दिनांक १५/०७/२०२२ शिक्षा कलम ५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान वर नमुद ताब्यात घेण्यात आलेला गुटखा हा डोंबिवली परिसरात राहणारे आरोपी गुजरात राज्य येथुन कंटेनरद्वारे गुटखा मागवुन त्याची ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरण करतात. त्या अनुषंगाने दिनांक २२/०२/२०२३ रोजी तुर्भे पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने डोंबिवली परिसरातील ऑर्चिड काउन, पलावा सिटी येथुन गुटखा व पान मसाल्याने भरलेला टेम्पो क्रमांक एम एच ०५ डी के ७८२९ व मानपाडा एमआयडीसी मधील पिंपळेश्वर मंदिराचे जवळुन आयशर कंटेनर टेम्पो क्रमांक जी जे ०१ के. टी ११३३ हा गुटखा व पान मसाल्यासह ताब्यात घेतला.

वर नमुद टेम्पो क्रमांक एम एच ०५ डी के ७८२९ चा चालक व गुजरात येथुन आयशर कंटेनर टेम्पो क्रमांक जी जे ०१ के. टी ११३३ मध्ये गुटखा व पान मसाला घेवुन येणारा कंटेनर चालक व डोंबिवली मानपाडा येथुन गुटखा व पानमसाल्याचे ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रायगड परिसरात वितरण करणारा एक इसम असे तीन जणांना ताब्यात घेवुन त्यांना सदर गुन्हयात दिनांक २२/०२/२०२३ रोजी २२:४० वाजता अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुददेमालाचे वर्णन खालील प्रमाणे

१) ६,२३,०६४/- रु. किंमतीचा MH 05 DK 7829 या सुझुकी सुपर कॅरी टेम्पोमध्ये एकूण १४ प्लास्टिक

गोण्यात गोल्ड ९००० पान मसाला, सागर पान मसाला, SR 9 तंबाकू किमंत सु. २) ५,००,०००/- रु. किंमतीचा टेम्पो किंमत सु. ३) ५५,५८,४००/- रु. किंमतीचा GJ 01 KT 1133 या टेम्पो कंटेनरमधील १२७ गोण्यामध्ये वि – १ तंबाकू,

सागर पानमसाला, विमल पान मसाला, शुद्ध प्लस पान मसाला, गोल्ड ९००० सुंगधित

सुपारी किमंत सुमारे ४) १५,००,०००/-रू.किंमतीचा कंटेनर आयशर टेम्पो किंमत सुमारे ८१,८१,४६४/- एकूण किंमत सुमारे

सदर गुन्हयात यापूर्वी दिनांक १९/०२/२०२३ रोजी जप्त केलेला १७,९६,८००/- रु. किंमतीचा गुटखा पान मसाला व दिनांक २२/२/२०२३ रोजी जप्त करण्यात आलेला ८१,८१,४६४/- रु. किंमतीचा गुटखा पान मसाला असा आत्ता पर्यत एकुण ९९,७८, २६४ रुपये किंमतीचा मुद्देमाल प्रस्तुत गुन्हयात जप्त करण्यात आलेला आहे.

सदरचा प्रतिबंधीत गुटखा हा ज्या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्यात वितरीत करण्यासाठी आलेला आहे त्या ठिकाणाचा शोध व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभाग असणाऱ्या सर्व आरोपींचा शोध घेवुन पुढील तपास करण्यात येत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई, श्री. मिलिंद भारंबे, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संजय मोहिते, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ १, वाशी श्री. विवेक पानसरे, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली तुर्भे पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. संजय जोशी, सपोनि. प्रभाकर शिऊरकर, पोहवा. २२८४ जितेंद्र पवार, पोना. २२१२ सोमनाथ भालेराव, पोना. ३१३९ संतोष पालवे, पोना. २७०७ आनंद सोनकांबळे, पोशि. ३४४६ राजेश आघाव, पोशि. १२४६४ मनोहर जाधव, पोशि. १२४७२ राजेश उगाडे, पोशि. ३५८७ सुनिल सकट यांनी केली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सुरू आहे.

Related posts

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

*निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती, काय आहेत निकष?*

Leave a Comment