Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात गांजासह आरोपी जेरबंद; २१०० ग्रॅम अंमली पदार्थासह १.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात गांजासह आरोपी जेरबंद; २१०० ग्रॅम अंमली पदार्थासह १.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत २१०० ग्रॅम गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत गांजा, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण १,७७,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थांचा अवैध व्यापार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४०९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बोडके करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास कोपरखैरणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील पार्किंगजवळील पादचारी शेड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या विठ्ठल बबन पवार (वय २६) याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून २१०० ग्रॅम वजनाचा गांजा, ६२,५४० रुपयांची रोख रक्कम आणि १०,००० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १,७७,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान फॉरेन्सिक व्हॅनची मदत घेण्यात आली तसेच ई-साक्ष अॅपद्वारे पंचनामा व फिर्याद प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामुळे तपास अधिक वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आला.

घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख, पोलीस निरीक्षक नरेंद्र डंबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक केशव केंद्रे यांनी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि तस्करीविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्याने सातत्याने प्रभावी मोहिम उभारली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्पर, धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. अशा कारवायांमुळे समाजात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी संदेश जात असून, युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलाची भूमिका अधिक बळकट होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related posts

रबाळे पोलीस ठाण्याची मोठी कामगिरी – चैन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड; २.४० लाख किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

कोपरखैरणेतील हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा

नेरुळ येथील हॉटेल गंगासागर,सिल्व्हर पॅलेस,भारती,साई दरबार, आणि शांदर अनाधिकृत असणाऱ्या अतिक्रमनवर नेरुळ पालिकेची धडाकेबाज कारवाई

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment