Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणेतील हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा

*कोपरखैरणेतील हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा*

नवी मुंबई (संतोष म्हात्रे) कोपरखैरणेतील खाडी किनारी महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला यश आले आहे. या घटनेतील मृत महिलेचे प्रेमसंबंध असलेल्या सुरक्षा रक्षकाने ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कोपरखैरणेतील ‘कांचनगंगा’ सोसायटीच्या विरुद्ध बाजूला असलेल्या खाडीतील झुडपांमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या गुन्हे शाखेने मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत मिसिंग झालेल्या महिलांबाबतची माहिती घेतली असता, ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सायदा बानू हासमी (३३) या महिलेचा तो मृतदेह असल्याचे आढळून आले होते. या महिलेने राजकुमारच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता..

राजकुमार बबुराम पाल (40) असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून मृत महिलेने राजकुमारच्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता. त्यामुळे संपाताच्या भरात राजकुमारने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आणि 48 तासांत आरोपीला अटक केली. महिलेच्या गळ्यावर खुणा आढळल्याने तिला गळा दाबून मारल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्यासाठी तिचा फोटो सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले. यानंतर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्याचे समोर आले.

तक्रारदार पती मोहम्मद अकिल फकीर मोहमंद हाशमी याच्याकडे मृत महिलेचा फोटो दाखवून चौकशी केली असती ती त्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली. महिलेचा नाव सायदा बानु हासमी असल्याची त्याने दिली. यानंतर पोलिसांनी मृत महिलेचा मोबाईल मिळवला तांत्रिक तपास करून आरोपी राजकुमारला ताब्यात घेतले.

असा झाला हत्येचा उलघडा

12 फेब्रुवारी रोजी एका अज्ञात महिलेचे प्रेत कौपरखैरणे येथील खाडीलगतल्या झुडपामध्ये आढळले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि भादवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा नवी मुंबई येथील गुन्हे शाखा करत होती. महिलेच्या शरीरयष्ठीवरुन ती घरकाम करत होती असा अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर नवी मुंबई आणि मुंबईतील देवनार, पंतनगर येथील हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारींचा आम्ही तपास केला. ट्रॉम्बे येथील एका तक्रारीसोबत या महिलेच्या मृतदेहाचे वर्णन जुळत होते. महिलेच्या पतीने पत्नीच्या मृतदेहाची ओळख पटवली. सायदा बानु हासमी असे या महिलेचे नाव असल्याचे त्यानंतर समोर आले.

“सायदा बानु ही जुईनगर येथे एका सोसायटीमध्ये मोलकरणीचे काम करत होती. आरोपी तिथेच सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मयत महिलेच्या मोबाईवर तीन मोबाईल क्रमांक सापडले ज्यामध्ये सुरक्षारक्षकाच्या क्रमांकवर आम्हाला संशय निर्माण झाला. त्यानंतर आरोपीपर्यंत आम्ही पोहोचलो. राजकुमार पाल असे आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. गेल्या एका महिन्यापासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मृत महिलेने माझ्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण माझं आधीच लग्न झालेलं असून मला पत्नी आणि दोन मुले आहेत असे आरोपी राजकुमारने सांगितले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि वादाचे रुपांतर हत्येत झाले,” अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

Related posts

मुख्यमंत्री महोदय यांनी ठाणेकरांसाठी नवीन वर्षी जीव गमवण्यासाठी दिले गिफ्ट “डायघर डम्पिंग प्रकल्प” .

jantechasavdhanmaharashtra

*सानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन*

jantechasavdhanmaharashtra

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment