Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

*स्वीकृत नगरसेवकासाठी विशाल डोळस यांना डावलले?*

स्वीकृत नगरसेवकासाठी विशाल डोळस यांना डावलले?

नवी मुंबई:- प्रतिनिधी

नवी मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवरून भारतीय जनता पक्षात अंतर्गत चर्चा रंगू लागली आहे. दिघा आणि तुर्भे येथे निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी नगरसेवकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात आल्याची चर्चा असताना, सिवुड्समधील तरुण माजी नगरसेवक विशाल डोळस यांना मात्र संधी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक पातळीवर सक्रिय आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळख असलेल्या डोळस यांनी विविध नागरी प्रश्नांवर आंदोलने केली होती. काही आंदोलने पक्षाची पूर्वपरवानगी न घेता केल्याची चर्चा असून, त्यांच्या ‘अति सक्रियपणा’मुळेच पक्षश्रेष्ठींनी त्यांना स्वीकृत नगरसेवकपदापासून दूर ठेवले का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

डोळस यांनी नवी मुंबईत पहिली CBSE शाळा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. तसेच स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या हक्कांचे प्रश्न आणि विविध प्रलंबित मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे जनतेत त्यांची एक लढाऊ कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली होती.

मात्र, स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांच्या नावाचा विचार न झाल्याने समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “लोकांच्या प्रश्नांसाठी लढणे चुकीचे होते का?” असा सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. काही जणांच्या मते, स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेला आव्हान देणारी त्यांची सक्रियता पक्षांतर्गत राजकारणात अडथळा ठरली असावी. या घडामोडींमुळे नवी मुंबईतील भाजप संघटनात्मक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी काळात पक्ष या विषयावर काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related posts

*ठाणे येथे पत्रकारांसाठी कार्यशाळा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पत्रकारांना रेनकोट-व छत्री वाटपाचा भव्य कार्यक्रम संपन्न*

अकरा मुक्या जनावरांना जीवदान. ओतूर पोलिसांची दमदार कामगिरी.

jantechasavdhanmaharashtra

*अनाधिकृत व मार्जिंग स्पेस  वापरणाऱ्या  व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment